देशभरात कांदासाठ्यावर पहिल्यांदाच बंदी ः रामविलास पासवान

आत्तापर्यंत राज्य सरकार परिस्थितीनुसार कांदासाठ्यावर बंदी घालत होते. मात्र, पहिल्यांदाच एकाच वेळी देशभरात व्यापाऱ्यांवर साठा बंदी घालण्यात आली आहे. - रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री
रामविलास पासवान
रामविलास पासवान

नवी दिल्ली : कांदादरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच देशभरात व्यापाऱ्यांवर कांदासाठा करण्यावर बंदी घातली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली. सरकार कांदा दर नियंत्रणासाठी करत असलेल्या विविध उपायांची देताना ते बोलत होते. ‘‘परिस्थितीनुसार आत्तापर्यंत राज्य सरकार कांदासाठ्यावर बंदी घालत होते. मात्र, पहिल्यांदाच देशभरात बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरकारने आधीच निर्यातबंदी करून दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले आहेत,’’ अशी माहिती पासवान यांनी दिली.  तसेच ‘‘काही राज्यांनी केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या बफर स्टॉकमधून कांदा खरेदी करून बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी केली आहे. याबद्दल या राज्यांचे अभिनंदन,’’ असे मंत्री पासवान म्हणाले.   ‘‘यंदा सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून ५६ हजार ७०० टन कांद्याचा बफर स्टॉक केला होता. या बफर स्टॉकमधून दिल्ली, हरियाना, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांनी खरेदी करून मागणी पूर्ण केली आहे. इतर राज्येही त्यांच्या निकडीप्रमाणे कांदा खरेदी करू शकतात,’’ असे ट्विट मंत्री पासवान यांनी केले.    साठा मर्यादा केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादा ठरवून दिली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी १०० क्विंटल (१० टन) तर घाऊक व्यापाऱ्यांसाठी ५०० क्विंटल (५० टन) साठा मर्यादा घातली आहे. तसेच कोणत्याही व्यापाऱ्याने या मर्यादेचे उल्लंघन करून अधिक कांद्याचा साठा केल्यास राज्य सरकारांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com