रस्त्यानेच रोखली संत्रा प्रक्रिया उद्योगाची वाट !

अमरावती : अवघ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांना बूस्ट देणाऱ्या १५० कोटींच्या प्रकल्पाची वाट रोखल्याचे समोर आले आहे.
Road obstacle in Santra Processing Unit construction
Road obstacle in Santra Processing Unit construction

अमरावती : अवघ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांना बूस्ट देणाऱ्या १५० कोटींच्या प्रकल्पाची वाट रोखल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्‍यातील ठाणाठुणी येथे प्रकल्प आहे. अमरावती-मोर्शी या मुख्य मार्गापासून हा प्रकल्प एक किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, पांदण रस्ता अतिक्रमणामुळे अवघा १२ मीटरचा उरला होता. प्रशासनाकडून तो २४ मीटरचा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीची मागणी केली गेली. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने एकाच बाजूच्या शेतकऱ्याकडून जमिनी खरेदी करून रस्त्याची लांबी वाढविण्यात आली.  रस्ते रुंदीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर सिमेंट रस्त्याची निविदा काढण्यात आली. त्याकरिता दहा कोटी रुपयांची तरतूद होती. एका राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्‍तीला हे काम मिळाले. त्याने उपकंत्राटदार नेमला, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र गेल्या चार वर्षांत खडीकरणापुढे ते सरकले नाही. परिणामी, प्रकल्पस्थळी बांधकाम साहित्य आणण्यापासून ते यंत्रसामग्री आणणे शक्‍य होत नसल्याने प्रकल्पाचीच वाट रोखण्याचे काम या रस्त्याने केले आहे. यामागे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या भागातील नेत्यांमध्ये असलेला इच्छाशक्‍तीचा अभाव अशी कारणे दिली जात आहेत. प्रतिक्रिया.. प्रकल्पाकरिता निधीच्या तरतुदीपासून ते यंत्रसामग्री खरेदीपर्यंत सर्व प्रक्रिया झाली आहे. २०१६ मध्ये प्रकल्पाचे भुमिपूजन झाल्यानंतर ४ ऑगस्ट २०१८ रोजी जागेचा ताबा मिळाला. त्याचे सपाटीकरण करण्यात आले. ४० टक्‍के संत्रा, ४० टक्‍के मोसंबी आणि २० टक्‍के लिंबू अशा फळांवर प्रक्रिया येथे होईल. सुमारे ३०० टन संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. त्याकरिता यंत्रसामग्रीची खरेदीदेखील झाली आहे. परंतु रस्त्याअभावी प्रकल्पस्थळापर्यंत बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री आणणारी वाहने येऊ शकत नाहीत. एक किलोमीटर रस्त्याचे काम मार्गी लावावे याकरिता पाठपुरावा केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. - विजय धाडीवाल, प्रकल्प व्यवस्थापक,  जैन फार्मफ्रेश उन्नती प्रकल्प

कंपनीकडून आपल्या अपयशाचे खापर रस्त्यावर फोडले जात आहे. हा प्रकल्प का रखडला? हे जाणून घेण्याकरिता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी बोलावले होते. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र चार वर्षांनंतर रस्त्याअभावी काम थांबल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. असे असेल तर प्रशासनाला सूचना देऊन रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.  - देवेंद्र भुयार, आमदार, वरुड, मोर्शी विधानसभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com