चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’चा आंदोलनाचा इशारा

बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची जडवाहतुकीमुळे दुरवस्था झालेली आहे.
 For road repairs in mud Rayat's movement warning
For road repairs in mud Rayat's movement warning

बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची जडवाहतुकीमुळे दुरवस्था झालेली आहे. याबाबत नागरिकांनी  उपोषणाचा इशारा दिला आहे. रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी गावकऱ्यांसह तहसीलदारांकडे निवेदन दिले. 

ग्रामीण भागातील रस्ते हे विकासात महत्त्वाचे असतात. परंतु, पळसखेड जयंती येथे शासकीय गोडाऊन असल्याने त्यात शासकीय माल साठवणे व काढण्यासाठी या रस्त्यावरून चारचाकी ते सोळा चाकी वाहने सातत्याने ये-जा करतात.  गावाजवळून शहर जवळ असल्याने गावकरी नियमित याच रस्त्यावरून जातात.  मात्र, रहदारीच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने त्यावरून शेतमालाची वाहतूकही होऊ शकत नाही.  पळसखेड जयंती फाटा ते गावापर्यतचा रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. 

याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, आजपर्यंत तोडगा न निघाल्याने गावकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी तहसीलदारांची भेट घेऊन या रस्त्याचे काँक्रिटीकरण  करावे, अशी मागणी केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास गावकऱ्यांनी उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com