संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८ गावांतील रस्ते राहणार बंद

सोलापूर शहराला जोडून असलेल्या ग्रामीण भागातील नऊ आणि आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दींवरील १७८ गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
Roads in 178 villages in Solapur district will remain closed during curfew
Roads in 178 villages in Solapur district will remain closed during curfew

सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात सोलापूर शहराला जोडून असलेल्या ग्रामीण भागातील नऊ आणि आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दींवरील १७८ गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार आहे’’, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

ग्रामीण भागात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, सोलापूर शहरातील लोक ग्रामीण भागात जाऊन कोरोना संसर्ग वाढवू नयेत, बाहेरून लोकांचे ये-जा होऊ नये, यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येतील. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवासुविधा पुरवविणाऱ्या आस्थापनांचे वाहतुकीच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरु राहतील, असे, पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे. 

आंतरजिल्हा, आंतरराज्य सीमाबंदी कायम

अक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमा बंद राहतील. ग्रामीण भागात सोलापूर, बार्शी, करमाळा उपविभाग (माढा तालुका), करमाळा तालुका, अकलूज, मंगळवेढा विभाग (सांगोला तालुका), मंगळवेढा तालुका या भागातील राज्यसरहद्दीवरील २०९ रस्त्यांपैकी गावांतील १७८ रस्ते बंद राहतील. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी पर्यायी रस्ते चालू राहतील, असेही पाटील यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले.

सोलापूरजीकचे हे मार्ग होणार बंद

हिरज ते विद्यापीठाजवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता, ति-र्हे ते शिवणी, केगाव ते खेड अंतर्गत रस्ता, हगलुर ते दहिटणे, पाथरी ते बेलाटी रस्ता, सोरेगाव ते डोणगाव ते नंदूर, सारेगाव ते समशापूर, सोरेगांव ते डोणगाव ते तेलगाव, विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com