Rain Damage Update : अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे अठराशे कोटींचे नुकसान : अशोक चव्हाण

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे अठराशे कोटींचे नुकसान : अशोक चव्हाण Roads due to heavy rains Loss of Rs 1800 crore: Ashok Chavan
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे अठराशे कोटींचे नुकसान : अशोक चव्हाण Roads due to heavy rains Loss of Rs 1800 crore: Ashok Chavan

मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले, ‘‘राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्या खालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून, दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.’’  दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. असे झाले नुकसान प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती. १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. अंतिम पाहणी अहवालात नुकसानीच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार असून, त्या वेळीही राज्यातील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com