परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) भुईमूग शेंगांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ३ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. 

गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. करडईची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ८००० ते १३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिक्रेटला ८०० ते ५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॉवरची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ६ क्विंटल आवक झाली. त्याला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com