कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः डॉ. विलास भाले 

विदर्भ, मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे या पिकासाठी आगामी काळात यंत्रमानव वरदान ठरेल, अशी अपेक्षा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केली.
Robot will be a boon for cotton crop: Dr. Luxury spears
Robot will be a boon for cotton crop: Dr. Luxury spears

अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख हेक्टर असून, सुमारे ३६ लाख शेतकरी कपाशीची लागवड करतात. विदर्भ, मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे या पिकासाठी आगामी काळात यंत्रमानव वरदान ठरेल, अशी अपेक्षा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केली. 

कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मिती संदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व ठाणे येथील ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्यूशन्स यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या वेळी डॉ. भाले बोलत होते. 

या प्रसंगी डॉ. भाले यांच्यासह ज्योश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, प्रगतिशील शेतकरी अरविंद नळकांडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन सहसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. नीलकंठ पोटदुखे, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, डॉ. धनराज उंदिरवाडे, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख (तणशास्त्र) डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. नितीन कोष्टी आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी कापूस वेचणीसह तण नियंत्रणासंदर्भातील अभिनव प्रयोग विदर्भात होत असल्याचे सांगितले. ठाण्याच्या ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्यूशन्स या कंपनीने गेल्या ६ महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले. 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकारे यांनी आपल्या सविस्तर सादरीकरणात यंत्र मानवनिर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. या उपक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहयोगाने विविध तांत्रिक बाजू बळकट करण्यात येत असून, माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे (सल्लागार समितीचे अध्यक्ष), डॉ. सुहास वाणी, विजय लाडोळे व अरविंद नळकांडे सारख्या शेतीतज्ज्ञांचे पाठबळ आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या तीन पेटंट्ससाठी कंपनीने अर्ज केला असून, जगातील पहिला इंटिग्रेटेड अॅग्रिकल्चर रोबोट हा भारतात बनणार असल्याचे ते म्हणाले. 

असा होईल उपयोग  कृषी यंत्रमानव हा कापसाच्या लागवडीचे पूर्ण यांत्रिकीकरण करेल. त्यात तणनिर्मूलन, कीटक, रोगनिर्मूलन तसेच कापसाची वेचणी ही सर्व कामे हा कृषी यंत्रमानव करेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com