agriculture news in Marathi robotics farming in agriculture syllabus Maharashtra | Agrowon

कृषी अभ्यासक्रमात रोबोटिक्स

मनोज कापडे
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे ः आर्टिफिशियल इंटेलिजिंट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच ड्रोन्स, रोबोट्स आणि मशिन लर्निंगवर आधारित भविष्यकालीन शेतीचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने घेतला आहे. 

पुणे ः आर्टिफिशियल इंटेलिजिंट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच ड्रोन्स, रोबोट्स आणि मशिन लर्निंगवर आधारित भविष्यकालीन शेतीचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने घेतला आहे. 

हवामान अद्ययावत शेती आणि पाणी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा वापर, असा मध्यवर्ती मुद्दा डोळ्यासमोर ठेवत एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पुढील वर्षी सुरू होईल. त्यात पहिल्या टप्प्यात २४ विद्यार्थ्यांना रोबोटिक्स् शेती शिक्षणाची संधी मिळेल. या अभ्यासक्रमाचा मसुदा निश्चित करण्यासाठी अलीकडेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांमधील शास्त्रज्ञांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली.

विद्यापीठाचे अधीष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी ‘अग्रोवन’ला सांगितले की, “भविष्यात सारे जग प्रिसिजन फार्मिंग अर्थात काटेकोर शेतीकडे केंद्रित होणार आहे. त्यामुळे आम्ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), सेन्सरबेस तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या मुद्द्यांचा आतापासूनच मागोवा घेत आहोत. हेच मुद्दे पुढील दशकात शेती क्षेत्राचे भवितव्य ठरवतील. त्यात महाराष्ट्राचा कृषी विद्यार्थी मागे राहू नये याकरिता आम्ही नवा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे.”

रोबोटिक्स किंवा एआयमुळे शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, बियाणे यावरील खर्चात मोठी बचत होईल. उत्पादकता वाढेल आणि अन्नधान्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असेल, असे राहुरी विद्यापीठाच्या प्रशासनाला वाटते. त्यामुळेच विदेशी शास्त्रज्ञांना विद्यापीठात निमंत्रित करून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आधारित शेतीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यास प्राधान्य देण्यात आले.

राज्याच्या शेतीत एआयचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज अचूक व वेळेत मिळतील, नवे कृषी उद्योजक तयार होतील तसेच जगातील आयातदारांना हवी असलेली गुणवत्ता पुरवण्यात शेतकरी यशस्वी होतील, असा दावा शास्त्रज्ञ करीत आहेत.

हवामान अद्ययावत शेती आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले की, “कृषी अभ्यासक्रमात ‘रोबोटिक्स’ व ‘एआय’चा सहभाग हा विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ विद्याशाखेने तत्त्वतः मान्यता यापूर्वीच दिली आहे. मात्र, अभ्यासक्रमाला महिनाभरात अंतिम रूप मिळून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मान्यतेसाठी पाठविले जाईल. परिषदेच्या मान्यतेनंतर पुन्हा विद्याशाखेची अंतिम मान्यता घेऊन अभ्यासक्रम सुरू होईल. हा अभ्यासक्रम चार घटकात उपलब्ध राहील.” 

अशी आहेत अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • कृषी विद्यापीठात अभ्यासक्रम निश्चित 
  • पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाची पदविका
  • ड्रोन्स, रोबोट्स, यंत्र शिक्षणाचा समावेश
  • पहिल्याच वर्षी  २४ विद्यार्थ्यांना संधी 
  • वेदर स्मार्ट ॲग्रिकल्चर, तंत्रज्ञान सामग्री, तंत्रज्ञान संसाधनांचा अभ्यास
  • शास्त्रज्ञ, शेतकरी आणि उद्योजकांशी संवाद
  • शास्त्रज्ञांऐवजी ‘प्रॅक्टिशनर्स’ तयार करण्याचे ध्येय

इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...