परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड

परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ११८ शेतकऱ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
from Rohayo Orchard cultivation on 88.15 hectare  in Parbhani
from Rohayo Orchard cultivation on 88.15 hectare in Parbhani

परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ११८ शेतकऱ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील २६४ कृषी सहाय्यकांना यंदा ‘मनरेगा’अंतर्गंत १ हजार ३२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकूण १ हजार ८५३  शेतकऱ्यांना १ हजार ३६६.१४ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी संमती देण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ८२८ लाभार्थ्यांना १ हजार ३४७.१६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

एकूण १ हजार ७९४ लाभार्थ्यांना १ हजार ३१८.२ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १४१ लाभार्थ्यांची १००.८१ हेक्टरवर खड्डे खोदले आहेत. ११८ लाभार्थ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली. 

परभणी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी १६ हेक्टरवर, जिंतूर तालुक्यात २३ शेतकऱ्यांनी १८.२० हेक्टरवर, सेलू तालुक्यातील १९ शेतकऱ्यांनी १५.९५ हेक्टरवर, मानवत तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी ५.४० हेक्टरवर, सोनपेठ तालुक्यात ९ शेतकऱ्यांनी ५.५०हेक्टरवर, गंगाखेड तालुक्यात ६ शेतकऱ्यांनी २.९० हेक्टरवर, पालम तालुक्यात १० शेतकऱ्यांनी ८.६० हेक्टरवर, पूर्णा तालुक्यात २६ शेतकऱ्यांनी १५.६० हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. फळबागेत संत्र्यांची ३३ शेतकऱ्यांनी २६.७५ हेक्टरवर, मोसंबीची ९ शेतकऱ्यांनी ६.८० हेक्टरवर, लिंबाची २६ शेतकऱ्यांनी १८ हेक्टरवर लागवड केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com