जत तालुक्यात `रोहयो`बाबत प्रशासनाची चालढकल

जत तालुक्यात `रोहयो`बाबत प्रशासनाची चालढकल
जत तालुक्यात `रोहयो`बाबत प्रशासनाची चालढकल

ज त, जि. सांगली : रोजगार हमीची कामे पूर्ण करूनही गेली दोन वर्षे बिले मिळाली नाहीत. तालुक्‍यात भीषण दुष्काळ पडला आहे. कामांसाठी शेतकरी स्थलांतरित होत आहेत. अशा परिस्थितीत रोहयोची कामे सुरू करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन चालढकल करीत आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ९) विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर संतापलेल्या म्हैसकर यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांना धारेवर धरले. म्हैसकर यांचा रुद्रावतार बघून वाघमळे निरुत्तर झाल्या. 

म्हैसकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १०) दुपारी जत पूर्व भागातील दुष्काळाची पाहणी केली. याशिवाय शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी अनेक अडचणी विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या. निकृष्ट पाणी, बंद असणारी रोजगार हमीची कामे, टॅंकरच्या खेपातील गोलमाल, अशुद्ध पाणीपुरवठा, कामातील दिरंगाई आदीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या.

वैयक्तिक रोजगार हमी योजनेतून केलेल्या शेततळे, गोटा, नालाबांध कामाचे गेली दोन वर्षे झाले पैसे मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खास करून गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आयुक्त संतापले, त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. कारभार सुधारण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक विभागाचा कामाचा आढावा जाणून घेऊन कामातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, उपविभागीय कृषी अधिकारी कांतापा खोत, तालुका कृषी अधिकारी संभाजी सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

मिनरल वॉटरसाठी धडपड  

जत दौऱ्यावर विभागीय आयुक्त येणार असल्याने प्रशासनाने सतर्कता दाखविली. दुपारी साहेबांना शुद्ध मिनरलचे पाणी हवे म्हणून म्हसूलचे दोन कर्मचारी शहरात पळापळ करीत होते. घोटभर पाण्यासाठी अख्खा तालुका तडफड करीत असताना अधिकाऱ्यास मात्र शुद्ध पाण्याची चिंता होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com