Agriculture news in marathi The role of agricultural centers in disseminating technology is important | Agrowon

`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी केंद्रांची भूमिका मोलाची`

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका मोलाची आहे.

हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका मोलाची आहे. कृषी विस्तार सेवा पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना त्यादृष्टीने निश्‍चितच फायदा होईल,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्रांद्वारे कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठीच्या कृषी विस्तार सेवा पदविका (डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स - डेसी) उत्तीर्ण कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. 

संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू बोंधारे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य माधुरी काटकर माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक महेंद्र माने, प्रा. नागेश माळोदे, प्रा. रमेश लोमटे, प्रा. साईनाथ मीनगिरे उपस्थित होते. 

पापळकर म्हणाले, ‘‘कृषी विस्तार सेवा पदविकेचा उद्देश निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे हा आहे. केव्हीकेच्या उपक्रमांचा  शेतकऱ्यांना फायदा होत आहे.’’

माने म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील हळदीला हिंगोली हळद म्हणून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मदत करावी.’’
डॉ. शेळके म्हणाले, ‘‘राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थान, हैदराबाद यांच्याद्वारे केव्हीकेद्वारे कृषी निविष्ठा विक्रेता पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बॅचमधील ४० विद्यार्थ्यांपैकी १२ कृषी निविष्ठा विक्रेते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.’’

या वेळी पापळकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक विष्णू बाहेती, द्वितीय प्रकाश डांगरे, तृतीय गोपाल झाडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले. तर आभार राजेश भालेराव यांनी मानले.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...