agriculture news in marathi The role of helping farmers: Shah | Agrowon

शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

लातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या काळात वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे,’’ असे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी स्पष्ट केले.

लातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या काळात वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सध्या रब्बी पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येवू नये, यासाठी कृषी पणन मंडळाच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे,’’ असे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी स्पष्ट केले.  

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून लातूर व मुरूड येथे सोयाबीन  शेतमाल तारण योजना राबविण्याला नुकतीच सुरवात करण्यात आली. शहा यांच्या  हस्ते या योजनेस प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र वीर, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, संचालक संभाजी वायाळ, संचालक विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, हर्षवर्धन सवई आदींची उपस्थिती होती. 

शहा म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या आवारात सोयाबीनची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. शेतकऱ्यांना आपला सोयाबीन हा शेतमाल तारण योजनेत ठेवून आर्थिक गरज भागविता येईल. कमी दरात माल विकण्याची गरज पडणार नाही. माल तारण ठेवल्यानंतर चालु दराच्या ७५ टक्‍के रक्‍कम ६ टक्‍के दराने ६ महिन्यासाठी उचलता येईल. ही रक्‍कम २४ तासांच्या आत आरटीजीएसने शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केली जाईल. दरात वाढ झाल्यास शेतीमाल शेतकऱ्यांना विक्रीही करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.’’ 

लातूर बाजार समितीच्या अतिरिक्‍त एमआयडीसी व मुरूड उपबाजारपेठेत या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश भोसले, प्रभारी सहाय्यक सचिव बी. आर. शिंदे, अमर मोरे, दीपक पठाडे उपस्थित होते. 


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...