महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉप

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
Rooftop for MSEDCL consumers
Rooftop for MSEDCL consumers

मुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होणार आहे. तर नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षअखेर शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाणार आहे.

या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रूफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॉट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्तसाह्य देण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॉटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॉटपेक्षा अधिक ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाइन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॉट– ४६,८२०, १ ते २ किलोवॉट- ४२,४७०, २ ते ३ किलोवॉट- ४१,३८०, ३ ते १० किलोवॉट- ४०,२९०, तसेच १० ते १०० किलोवॉटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॉट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

ग्राहकांकडून महावितरण घेणार वीज विकत रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज प्रति युनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. 

  • गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना २० टक्के अनुदान
  • साधारणतः ३ ते ५ वर्षांत परतफेड परतफेडीची संधी
  • यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार
  • घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना होणार लाभ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com