Agriculture news in Marathi The root of profitable agriculture in the change in cropping pattern: Vice Chancellor Dr. Spears | Agrowon

पीक पद्धतीमधील बदलात फायदेशीर शेतीचे मूळ ः कुलगुरू डॉ. भाले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

अकोला ः पारंपरिक पद्धतीने करावयाच्या शेतीचे दिवस आता कालबाह्य झाले असून जमिनीचा पोत, उपलब्ध सिंचन सुविधा, बाजारपेठेचा आढावा घेत परिस्थितिनुरूप पीक पद्धतीतील बदल भविष्यातील फायदेशीर शेतीची नांदी आहे. हे आता कृतीतून दाखवायचे दिवस आले असून कृषी विद्यापीठ आपल्या शेतीविषयक प्रत्येक शंकेचे समाधान करण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

अकोला ः पारंपरिक पद्धतीने करावयाच्या शेतीचे दिवस आता कालबाह्य झाले असून जमिनीचा पोत, उपलब्ध सिंचन सुविधा, बाजारपेठेचा आढावा घेत परिस्थितिनुरूप पीक पद्धतीतील बदल भविष्यातील फायदेशीर शेतीची नांदी आहे. हे आता कृतीतून दाखवायचे दिवस आले असून कृषी विद्यापीठ आपल्या शेतीविषयक प्रत्येक शंकेचे समाधान करण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

यंदा खरीप हंगामाला सुरुवात झाली असून बऱ्याच भागांमध्ये समाधानकारक पावसानंतर पेरणीसुद्धा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने कुलगुरू डॉ. भाले यांनी बाळापूर तालुक्यातील अडोशी-कडोशी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली.

या प्रसंगी शेतकऱ्यांनी शेतीविषयक समस्या तथा विद्यापीठ व शासनाकडून अपेक्षा संदर्भात चर्चा केली.  कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनात सूर्यफूल, ज्वारी, करडई, ओवा, हरभरा, सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी याच भागातील असून केवळ जंगली प्राणांच्या उपद्रवाने अधिक फायदा देणारी पिके घेता येत नसल्याची खंत प्रगतिशील शेतकरी पांडुरंग गायकी यांनी व्यक्त केली.

कपाशी पिकातील बीटी वाण लागवड करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात सुद्धा चर्चा केली. विद्यापीठाने कपाशीचे बीटी वाण तसेच सोयाबीन, उडीद, तूर या पिकांचे भरघोस उत्पन्न देणारे नवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. परिसरातील शेतीविषयक उपलब्धींविषयी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी अवगत केले.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...