agriculture news in Marathi rose demand decreased due to market closed Maharashtra | Agrowon

कोरोनामुळे उतरली गुलाबाची लाली 

गणेश कोरे
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद झाल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लग्नसराईत मागणी असलेल्या गुलाब फुलांची बाजारपेठ ठप्प झाल्याने फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पुणे ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद झाल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लग्नसराईत मागणी असलेल्या गुलाब फुलांची बाजारपेठ ठप्प झाल्याने फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मावळ तालुका आणि तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्कमधील फुलांना गेल्या आठवड्यापासून मागणी नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे एका आठवड्यात जवळपास सहा कोटींचे नुकसान झाले आहे. 

व्हॅलेंटाइन डेनंतर गुलाबांना विशेष मागणी असलेला हंगाम म्हणजे लग्नसराई. देशभरात लग्नसराई सुरू झाल्यानंतर तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क आणि मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विविध रंगी गुलाबांना मागणी असते. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या फैलावापासून बचावासाठी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांमध्ये लग्न समारंभ रद्द करण्याबरोबरच सीमित स्वरूपात होत असल्याने गुलाब फुलांची मागणी घटली आहे. देशातील विविध बाजारपेठा बंद असल्यानेदेखील मागणी ठप्प झाली आहे. 

याबाबत माहिती देताना तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कचे अध्यक्ष मल्हारराव ढोले म्हणाले, ‘‘व्हॅलेटाइन डेनंतरची काढणी झाल्यानंतर मार्च, एप्रिलमधील लग्न हंगामासाठीचा फ्लश सुरू होतो. सध्या हा फ्लश सुरू झाला असून, दररोज एकरी सुमारे २ हजार फुलांची काढणी होते. मात्र कोरोनामुळे देशभरातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद झाल्याने पुरवठा थांबला आहे.

व्हॅलेंटाइनला २० फुलांच्या गड्डाली २५० रुपये दर होता. तोच दर लग्न हंगामात ५० ते ६० रुपये असतो. मात्र आता बंदमुळे दरच नसल्याने फुले काढणीसाठी होणारा मजुरांचा खर्च टाळण्यासाठी फुले जागीच पिंच आणि स्टेम मोडले जात आहेत. यामुळे एकरी साधारण ५० हजार रुपयांचे नुकसान आठवड्याला होत आहे. पार्कमध्ये सुमारे २०० एकरवर पॉलिहाऊसमधून फुलांचे उत्पादन घेतले जात आहे.’’ 

पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यात सुमारे १ हजार २०० एकरवर पॉलिहाउसमधून गुलाबाचे उत्पादन घेतले जात आहे. ही फुले देशासह निर्यात केली जातात. सध्याचा फ्लश हा देशांतर्गत असून, एकरी साधारण २ हजार फुलांचे नियोजन असते. सध्या कोरोनामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प असल्याने सुमारे २५ लाख फुलांचा पुरवठा ठप्प झाला आहे, तर शीतगृहांमध्ये सुमारे ३० लाख फुलांचा साठा शिल्लक आहे. ही परिस्थिती कधी सुधारेल याबाबत आम्ही साशंक असल्याने नुकसान वाढीचा धोका आहे. 
----- 
दृष्टिक्षेपात गुलाब उत्पादन 
मावळ, तळेगावातील क्षेत्र ः
दीड हजार एकर 
दैनंदिन एकरी उत्पादन ः सुमारे २ हजार फुले 
एका दिवसातील उत्पादन ः ३० लाख फुले 
सरासरी दर ः अडीच रुपये 
एका दिवसाचे नुकसान ः ७५ लाख रुपये 
आठ दिवसांचे नुकसान ः सुमारे ६ कोटी 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...