पुण्यात गुलाब प्रदर्शनास प्रारंभ

गुलाब प्रदर्शन
गुलाब प्रदर्शन

पुणे ः दि रोझ सोसायटी आॅफ पुणे या संस्थेतर्फे दोनदिवसीय गुलाब प्रदर्शनाला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे शनिवारी (ता. ५) प्रारंभ झाला. प्रदर्शनामध्ये राज्यभरातील गुलाब उत्पादक तसेच हौशी गुलाबप्रेमींनी २५०० गुलाबांची फुले मांडली होती. 

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ‘एसआरपीएफ’च्या डीआयजी अर्चना त्यागी यांच्या हस्ते झाले. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये एकूण ७३ विभागांमध्ये गुलाब प्रदर्शित करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. भाग्यश्री टकले यांना कै. लक्ष्मीबाई अनंत नाईक रौप्य पदक आणि लातूर जिल्ह्यातील कृष्णा उपाडे यांना गुणवंत गुलाब उत्पादक शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज (रविवारी) प्रदर्शनाचा समारोप होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com