राजभवनात साकारले रोजगार्डन

गुलाब
गुलाब

नागपूर ः ऐतिहासिक व समृद्ध वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरात सहा एकरांवर रोज गार्डन साकारण्यात आले आहे. विविध रंगाच्या तसेच प्रजातीची सुमारे पाच हजार झाडे या क्षेत्रात बहरली आहेत. यामध्ये २५० प्रकारच्या गुलाबाच्या प्रजाती असून १ हजार ७७१ झाडांवर रंगांची उधळण करीत गुलाबाचा राजा डौलाने उभा आहे. विविध जैवविविधतेने नटलेल्या राजभवन परिसरात रोज गार्डन मुख्य आकर्षण ठरत आहे. या गुलाबाच्या फुलांमध्ये कुठलीही परंपराग प्रजाती नसून नागपूरच्या उन्हाळ्यातही गुलाबाच्या झाडांचा सांभाळ करता येईल, अशाच प्रकारच्या प्रजाती येथे विकसित करण्यात आल्याची माहिती राजभवनचे प्रमुख रमेश येवले यांनी दिली. राजभवन परिसरातील सुबाभूळच्या जंगलात हे रोजगार्डन विकसित करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी बंगळूरू, म्हैसूर आदी ठिकाणांहून गुलाबाची झाडे आणण्यात आली होती. परंतु, येथील ४७ डिग्री तापमानामध्ये त्यांचा सांभाळ करणे शक्‍य नसल्यामुळे गुलाबप्रेमी मुकुंद तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबाच्या झाडांचे बडिंग, ग्राफ्टींग करून येथील हवामानात बहरू शकतील, अशाप्रकारच्या फुलांच्या जाती विकसित करण्यात आल्या. हे संपूर्ण रोजगार्डन जैवविविधतेची काळजी घेतानाच सेंद्रीय पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करण्यात येते.  गुलाबाच्या झाडांना कडूनिंबाचे तेल व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण फवारण्यात येते. यामुळे परागकणाच्या माध्यमातून मधमाश्‍यांना अन्नद्रव्य उपलब्ध होते. रोज गार्डनमध्ये गुलाब फुलांच्या प्रजातीपैकी हायब्रीड टी या जातीची १२५ प्रकारच्या एक हजारपेक्षा जास्त फुलांची झाडे आहेत. फ्लोरिबंडा, मिनीएचर, क्‍लायंबर रोजेस १२५ प्रकारचे आहेत. या फुलांची ८०० पेक्षा जास्त झाडे असून प्रत्येक झाडाला दोनपेक्षा जास्त व काही झाडांना ४० फुलांचे गुच्छ आहेत. मध्यभारतातील हे सर्वांत मोठे रोजगार्डन असल्याची माहिती प्रभारी अधिकारी रमेश येवले यांनी दिली. या माध्यमातून राजभवनचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com