प्रतिकूल हवामानाने गुलाबाची लाली गेली

पार्कमधील ८० टक्के शेतकरी व्हॅलेंटाइनसाठीचे नियोजन करत असतात. यंदा २५ जानेवारीमध्ये फुलांचे सॅम्पल पाठवून त्यानंतर साधारण ३० जानेवारीपासून निर्यातीला सुरुवात होईल. यंदा ५० लाख फुलांच्या निर्यातीचे उद्दिष्ट आहे. - मल्हारराव ढोले, अध्यक्ष - तळेगाव दाभाडे फ्लोरिकल्चर पार्क.
rose production
rose production

पुणे : यंदाच्या प्रतिकूल हवामानाने जसा इतर सर्व पिकांना फटका दिला, तसाच फटका पॉलिहाउसमध्ये घेतल्या गेलेल्या गुलाबालाही बसला आहे. परिणामी नाताळसाठी अपेक्षित निर्यातक्षम उत्पादन न मिळाल्याने निर्यात ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर देशांतर्गत बाजारातदेखील फुलांनी मागणी कमी राहिल्याने पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, हे नुकसान साधारणत: एकरी २ लाखांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  मॉन्सून, सततचे ढगाळ वातावरणाने बहुसंख्य पॉलिहाउसमध्ये डाऊनी आणि करपासारख्या रोगांमुळे गुलाबाची लाली काळवंडली आहे.  तळेगाव फ्लोरिक्लचर पार्क सोसायटीचे अध्यक्ष मल्हारराव ढोले याबाबत बोलताना म्हणाले, की नाताळ आणि व्हॅलंटाइनसाठी फुलांचे नियोजन दरवर्षी केले जाते. यंदादेखील तसे नियोजन विविध शेतकऱ्यांनी केले होते.   मात्र यंदा लांबलेला पाऊस, सततचे ढगाळ वातावरण, अपुरा सूर्यप्रकाश यामुळे फुलांवर डाऊनी आणि करप्याचा प्रादुर्भाव झाला होता. हा प्रादुर्भाव जून आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत झाल्याने निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घटले. दरवर्षी पार्क मधून नाताळासाठी आखाती देशांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लड आदी देशांमध्ये साधारण २० लाख फुलांची निर्यात केली जाते. मात्र यंदा फुलांचा दर्जा नसल्याने आणि निर्यातदारांना निर्यातीसाठीच्या कन्साईनमेंटसाठी अपेक्षित फुले न मिळाल्याने ५० टक्क्यांनी निर्यात कमी झाली आहे. निर्यातीला एका फुलाला लांबीनुसार १० ते ११ रुपये मिळत होते. मात्र आता हीच फुले ५ -६ रुपयांनी देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी लागत आहेत. सध्या केवळ १० लाख फुलांची निर्यात झाल्याच्या माहिती आहे.  देशातील आंदोलनाचा फटका  मी यंदा नाताळाचे नियोजन करुन, १० डिसेंबरला कट घेतला होता. त्यानुसार ५० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र डाऊनी, करप्यामुळे २५ ते ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित आहे. निर्यातीसाठी ही फुले योग्य नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे असल्याने, आता ही फुले दिल्ली, जयपूरसाठी पाठविली जाणार आहेत. मात्र सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोधासाठी होणाऱ्या आंदोलनाची झळ नाताळ सणावर असल्याने दिल्लीतून मागणी कमी झाली आहे. यामुळे देशातंर्गत बाजारात २० फुलांच्या जुडीला मिळणारे १५० ते १६० रुपये दर आता १०० रुपयांपर्यंत आले आहेत. - व्ही. एस. जम्मा,  फ्लोरिक्लचर पार्क पॉलिहाउसधारक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com