‘पीएम किसान’च्या कामाची ‘कृषी’, ‘महसूल’मध्ये टोलवाटोलवी

खानदेशात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसंबंधीच्या अडचणी कृषी व महसूल विभागातील टोलवाटोलवी, वाद यामुळे कायम आहेत. महसूल विभागातील मंडळी हे काम आपल्याकडे नाही, कृषी विभागात जा, असे सांगत आहे.
Rotate in ​​‘Agriculture’, ‘Revenue’ of the work of ‘PM Kisan’
Rotate in ​​‘Agriculture’, ‘Revenue’ of the work of ‘PM Kisan’

जळगाव : खानदेशात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसंबंधीच्या अडचणी कृषी व महसूल विभागातील टोलवाटोलवी, वाद यामुळे कायम आहेत. महसूल विभागातील मंडळी हे काम आपल्याकडे नाही, कृषी विभागात जा, असे सांगत आहे. तर कृषी विभागातील मंडळी आमच्याकडे पीएम किसानसंबंधीचे आयडी-पासवर्ड नाहीत, काम कसे करणार, असे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावत आहे. 

या बाबत जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ‘अॅग्रोवन’कडे याबाबतच्या अडचणी, समस्या याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही महसूल विभागात म्हणजेच जळगाव तहसील कार्यालयात पीएम किसानसंबंधीच्या अडचणी घेवून गेलो. तेथे संबंधित कर्मचाऱ्याने हे काम आम्हाला करायला वरिष्ठांनी नाही सांगितले आहे. हे काम आपले नाही. याबाबत पोर्टलवर लॉगईन करून दुरुस्तीचा प्रयत्न केला तर पुढील कारवाईला तयार राहा, असेही वरिष्ठांनी दरडावले आहे, असे सांगितले. त्यांनी कृषी विभागात जा, असाही सल्ला दिला. 

तेथून कृषी विभागात पोचलो. कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांची भेट घेतली. त्यांनी हे काम आम्ही कसे करू. आमच्याकडे पोर्टलवर दुरुस्तीसाठी आवश्यक आयडी-पासवर्ड नाहीत, असे सांगून याबाबत काम करण्यास असमर्थता दाखविली. तसेच तहसील कार्यालयात जावून चौकशी करा, असाही सल्ला दिला. असाच प्रकार महिनाभरापासून सुरू असून, शेतकरी याला कंटाळले आहेत. शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. काम करायचे नसेल तर वेतनही घेवू नका. महसूल-कृषी असा वाद हकनाक तयार करण्यात आला. तो सोडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधीदेखील पुढे येत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. जबाबदारी पाळायचीच नाही तर ही योजनाच बंद करा, तशी अधिकृत घोषणा शासनादेश, पत्र काढून करा, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com