पिंपरी निपाणी येथे शेतकऱ्याने नुकसानग्रस्त पीक केले नष्ट

अमरावती जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकावर फिरविला नांगर
अमरावती जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकावर फिरविला नांगर

अमरावती ः पावसाअभावी पीक करपल्याने आलेल्या नैराश्‍यातून एका शेतकऱ्याने तब्बल नऊ एकर शेत नांगरून काढले. हमीद खान पठाण असे त्या शेतकऱ्याचे नाव असून, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील पिंपरी निपाणी शिवारात त्यांची शेती आहे. 

पिंपरी परिसरात मागील २० ते २५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पीक करपले आहे. आता प ाऊस आला तरी त्याचा फारसा फायदा होणार नसल्याने हमीद खान यांनी उभ्या शेतात ट्रॅक्‍टर फिरविले. त्यांना पेरणीसाठी सात हजार रुपयांचा खर्च आला. संपूर्ण ९ एकरांतील पेरणीसाठी ६३ हजार रुपये लागले. विशेष म्हणजे शेतात पेरणीसाठी त्यांनी दागदागिने गहाण ठेवले. त्यासोबतच बॅंकेकडून कर्जही घेतल्याचे सांगण्यात येते. पिंपरी निपाणी परिसरातील ८० टक्‍के शेतामधील पिके करपली असून, आता पाऊस आला तरी त्याचा फायदा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

पिंपरीच्या सरपंचांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल तसेच तहसीलदारांकडे पीकपाहणी करून पंचनामे करण्याची मागणी निवेदनातून यापूर्वीच केली. संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा कंपनीकडून सर्व्हेक्षणाच्या मागणीचाही निवेदनात समावेश आहे. सरपंच विशाल रिठे, हमीद खान पठाण, शुभम अतकर, उमेश रिठे, विलास रिठे, गणेश रिठे, समीर पठाण, कुमार थोरात, विलास वाघमारे, सचिन रिठे यांनी हे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

आमदारांनी केली पाहणी नांदगाव तालुक्‍यात पावसाभावी करपलेल्या पिकांची पाहणी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी केली. नांदगाव तालुक्‍यातील कोदोरी, पिंपळगाव बैनाई, टाकळी कानडा, पिंपरी निपाणी, राजना, काजना, बोरगाव, टाकळी गिलबा या गावांना त्यांनी भेटी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com