गिरणाचे आवर्तन धरणगाव, जळगाव तालुक्‍यात पोचले

जळगावः गिरणा नदीकाठ व इतर भागातील पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी मागील आठवड्यात आवर्तन सोडण्यात आले. ते नदीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच धरणगाव, जळगाव तालुक्‍यातील गावांपर्यंत पोचल्याचे चित्र आहे.
farmers' groups selling fruits and vegetables of Crores in Beed district
farmers' groups selling fruits and vegetables of Crores in Beed district

जळगाव ः गिरणा नदीकाठ व इतर भागातील पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी मागील आठवड्यात आवर्तन सोडण्यात आले. ते नदीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच धरणगाव, जळगाव तालुक्‍यातील गावांपर्यंत पोचल्याचे चित्र आहे. 

टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार हे आवर्तन मागील आठवड्यात सोडण्यात आले. 

सध्या मे महिना सुरू आहे. गिरणा काठावरील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, कूपनलिकांची जलपातळी घटली आहे. शिवारातही टंचाई जाणवत आहे. कारण, नदीत वाळू उपसा अनेक वर्षे झाला आहे. अजूनही वाळू उपसा सुरू असल्याने नदीत पाणी जिरण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे नदीकाठी टंचाई निर्माण झाली आहे. 

ही समस्या दूर करण्यासाठी धरणातून एक हजार ५०० क्‍युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा पाचोरा व भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्‍यातील नदीकाठावरील अनेक गावांना लाभ होणार आहे. लिंबू, केळीच्या बागांना टंचाई भासणार नाही. तसेच कापूस व इतर पिकांची लागवडही कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी करू शकतील. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या कूपनलिका, पाणी योजनांचे जलस्त्रोत वाढतील. अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गिरणा धरणात ३९.६४ टक्के म्हणजेच सात हजार ३३२ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com