टेंभूच्या आवर्तनाने दुष्काळग्रस्तांना दिलासा

टेंभूच्या आवर्तनाने दुष्काळग्रस्तांना दिलासा
टेंभूच्या आवर्तनाने दुष्काळग्रस्तांना दिलासा

कडेगाव, जि. सांगली : सध्या सर्वत्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याअभावी रब्बी व अन्य पिकांची अवस्था बिकट आहे. टंचाईवर मात करण्यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची केली. त्यानुसार टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

योजनेच्या टप्पा क्र.१ (अ) येथील १९५० अश्‍वशक्तीचे सध्या पाच पंप व टप्पा क्र.१(ब) येथील २००० अश्‍वशक्तीचे चार पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने या पंपामध्ये वाढ करण्यात येणार आहे. टप्पा क्र.(अ) येथील एकूण १६ पंप, तर टप्पा क्र.१ (ब) येथील १८ पंप सुरू करण्यात येणार आहेत. तलावाची पाणीपातळी कमी झाल्याने पहिल्यांदा हा तलाव भरून घेतला जाणार आहे. त्यानंतर टप्पा क्र.२ येथील १४०० अश्‍वश्क्‍तीचे दोन पंप सुुरू करून सुर्ली कालव्यात पाणी सोडले जाईल. या कालव्यातून हे पाणी सुर्ली, खंबाळे औंध, नेर्ली अपशिंगे, कोतवडे, कडेगाव असे २२ कि.मी.पर्यंत पाणी दिले जाईल. त्यानंतर कामथी कालव्यात पाणी सोडण्यात येईल. त्यातून कामथी, शिवाजीनगर, रेणूसेवाडी, विहापूर, शाळगाव, करांडेवाडी, बोंबाळेवाडीपर्यंत १५ कि.मी.पर्यंत पाणी मिळेल.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने सर्वत्र टंचाईची परिस्थिती आहे. तालुक्‍यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. रब्बी पिकांसह अन्य पिके वाळून जाण्याचा मार्गावर आहेत. तालुक्‍यात पाऊस समाधानकारक झाला नाही. परिणामी जमिनीतील भूजलपातळी घटल्याने विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे रब्बीसह अन्य पिकेही धोक्‍यात आली. परंतु आता सुरू झालेल्या टेंभू योजनेच्या आवर्तनाने या लाभ क्षेत्रातील शेती ओलिताखाली येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com