‘गंगापूर’मधून मराठवाड्यासाठी आवर्तन

‘गंगापूर’मधून मराठवाड्यासाठी आवर्तन
‘गंगापूर’मधून मराठवाड्यासाठी आवर्तन

नाशिक : पाणीटंचाईमुळे जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरण समूहातील गंगापूर व दारणा धरणातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी शेवटचे आवर्तन सोडले आहे. पाण्याचा विसर्ग २९०० क्युसेस असून सोडलेले पाणी गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा नांदूर-मध्यमेश्वर धरणात पोचले. 

नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तरीही प्रशासनाने पाणी देण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला. गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी या धरणातून २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळात सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांनाही याचा दिलासा मिळणार आहे. हे पाणी नदीमार्गे नांदूर-मध्यमेश्वर येथे  पोहचले. येथून हे पाणी पुढे डाव्या व उजव्या कॅनॉलच्या माध्यमातून वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहात्याला सोडण्यात येणार आहे. 

सध्या गोदा काठ परिसरातही दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. मात्र या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.

दारणा आणि गोदावरी नदीचे पात्र अनेक दिवसांपासून कोरडे आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना बंद झाल्या होत्या. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आठ दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या गोदावरी व दारणा नदीमार्गे हे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ नाशिक शहरासह भगूर, कँटोन्मेंट, सिन्नर एमआयडीसी, सायखेडा, चांदोरी, निफाड तालुक्यांसाठी होईल. 

पाणी वाया न जाता संबंधित गावापर्यंत पोचावे, अवैध उपसा होऊ नये, याबाबत पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या. त्यासाठी आगामी पंधरा दिवस पाण्याच्या वहन मार्गावर रोज २२ तास वीजपुरवठा खंडित केला जाईल. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. 

मराठवाड्यासह नगर जिल्ह्यालाही पाणी 

गोदावरी नदीचे पाणी आटल्याने एक महिन्यापासून अनेक योजना बंद पडल्या होत्या. या योजना पुन्हा सुरू होऊन गावांना दिलासा मिळेल. यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गंगापूर धरणातील पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहाता या शहरांची तहान भागविणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com