Agriculture news in marathi Rotation missed for rabbi, Mill water up to the canal | Page 2 ||| Agrowon

रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी कानळदापर्यंत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा नदीतूनही विविध गावांमधील टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले. 

जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा नदीतूनही विविध गावांमधील टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले. हे पाणी नदीच्या अखेरच्या टप्प्यातील गावांपर्यंत पोचले आहे. 

गिरणा धरणातून नदीत विविध गावांच्या पाणी योजनांचे स्रोत मजबूत व्हावेत, पुनर्भरण व्हावे यासाठी पाणी सोडले जाते. परंतु गेल्या वेळेत हे पाणी नदीच्या अखेरच्या टप्प्यात दाखल झालेच नाही. अमरावती-नवापूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामातील बायपासमध्ये गिरणा नदीवर आव्हाणे नजीक पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे पाणी आव्हाणेपर्यंत पोचले नाही. प्रशासनाने पुलाचे नुकसान होऊ नये, समस्या तयार होऊ नये यासाठी हे पाणी आव्हाणेपर्यंत पोचू दिले नाही.

परिणामी नदीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच कानळदा-नांद्रा बुद्रकपर्यंत पाणी पोचले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु या पुलानजीक मध्यंतरी नदीचे पाणी पुढे प्रवाहित होण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. आवश्यक ती कार्यवाही तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली. यामुळे या महिन्यातील आवर्तन कानळदा गावाच्या पुढे पोचले आहे. 

शिवाय धुळ्यातील शिरपूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अनेर, धुळे, शिंदखेडासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पांझरा प्रकल्पातूनही रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तालुक्यात रब्बीसाठी लाभदायी असलेल्या हतनूर प्रकल्पाच्या पाटचारीतही पाणी सोडले आहे.

गिरणा धरणातूनही चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव भागासाठी पाटातूनही सिंचनासंबंधी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पिकांना लाभ होणार आहे. हरभरा, गहू, दादर ज्वारी या पिकांचे सिंचन शेतकरी करून घेत आहेत. बाजरी पिकालाही पाणी दिले जात आहे. हतनूर व गिरणा धरणाच्या माध्यमातून ३० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ झाल्याचे चित्र आहे
 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...