`म्हैसाळ`चे पाणी आवर्तन सुरू

 rotation of the water of 'Maisal' started
rotation of the water of 'Maisal' started

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे २५ कोटी २३ लाख वीजबिल थकले होते. कृष्णा खोरे महामंडळाने जिल्ह्यातील तिन्ही योजनांचे १८ कोटी ९१ लाख वीजबिल भरल्याने योजना सुरू करण्याचा प्रश्न सुटला होता. 

गतवर्षी पाऊस भरपूर झाल्याने योजनेच्या पाण्याची गरज लवकर निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र फेब्रुवारीतच तलाव कोरडे पडले. विहिरींनी तळ गाठला. कूपनलिकांना गुळण्या टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, त्यांच्या मागणीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले होते. आवर्तन सुरू केले नाही, तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबविली. त्याचवेळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी नोंदवावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली होती. त्यामुळे शेतकरी पाणी मागणीची नोंदणी करू लागले; परंतु केवळ २७० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज केले. मात्र, पाणी मागणी कमी असल्याने योजना सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला.

वास्तविक, मागणी नसली तरी योजना सुरू केली पाहिजे, तरच उन्हाळी पिकांसह द्राक्ष आणि डाळिंब पिकांना वेळेत पाणी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

पैसे भरल्यास वितरिकेतून पाणी 

म्हैसाळ योजनेचे पाणी आता मुख्य कालव्यातून वाहू लागले आहे. शाखा कालवे वितरिका व लघुवितरिका या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पैसे जमा केल्यानंतरच सुरू करण्यात येतील. म्हणून शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर पैसे जमा केल्यास पाणी देणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकर पैसे जमा करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com