म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद
म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद

सांगली : नरवाड येथील दुसऱ्या टप्प्यातील सहा पंप नादुरुस्त होऊन बंद पडले. अशा स्थितीत अपुऱ्या आणि नादुरुस्त पंपांसह म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवणे शक्य नाही. नाईलाजाने सर्वच टप्प्यांतील दुरुस्ती करण्यासाठी पूर्ण म्हैसाळ योजना वीस दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

म्हैसाळ योजनेचे मागील चार महिने १४१ दिवस सलग आवर्तन सुरू होते. पाचही टप्प्यांत काही विद्युत मोटारी आणि पंप यांच्या दुरुस्त्या निघाल्या आहेत. तरीही पर्यायी पंप वापरण्यात आले. सहाव्‍या ''अ'' आणि ''ब'' या नव्या दोन टप्प्याची उद्घाटन चाचणी शेवटी झाल्याने पंप संख्या कमी असूनही आवर्तन सुरू राहिले. अकरा पंपांपैकी पाच ते सहा पंप अचानक नादुरुस्त झाले. पर्यायी पंपसुद्धा यापूर्वी दुरुस्त झाले. तरीही सहा पंप सुरू होते, पण त्यापुढील तीन टप्पे आणि जतमधील टप्प्याकरता आवश्यक पाणी पाच सहा पंपांमधून उचलून रोटेशन नीट पूर्ण होऊ शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

पंपदुरुस्तीसह सर्व पंपांची पाहणी, देखभाल करण्यात येणार आहे. बेडग, आरग, लिंगनूर या भागातील कॅनॉलवरील लायनिंग कामे, लिकेज काढणे, व्हॉल्व्ह पद्धतीने वितरण करता यावे, अशा नव्या रचनेस प्रारंभ करता येण्यासाठी व्हॉल्व्ह बसविणे, ही कामे करण्यात येणार आहेत. 

 ७.७ टीएमसी पाणी वितरित वीस दिवसांत युद्धपातळीवर ही कामे पूर्ण करून उन्हाळी आवर्तनासाठी पुन्हा योजना सज्ज करण्याचा प्रयत्न राहणार आहे. लगेचच योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याबाबत निर्णय होऊन पुन्हा आवर्तन सुरू होईल. मागील पावणेपाच महिन्यांत सलग जिल्ह्यातील दुष्काळी भागात ७.७ टीएमसी पाणी वितरित करण्यात आले, अशी माहिती खात्याने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com