agriculture news in marathi Rotavator on banana in Ardhapur area | Agrowon

अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग, दराने त्रासले शेतकरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

अर्धापूर भागातील केळीवर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, केळीचे दर तीनशे रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या केळीवर रोटावेटर फिरवावा लागत आहे.

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर भागातील केळीवर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, केळीचे दर तीनशे रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या केळीवर रोटावेटर फिरवावा लागत आहे. आधी अतिवृष्टी, आता रोगाचा प्रादुर्भाव, तसेच वीजबिलाची सक्ती यामुळे शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत सापडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड व भोकर तालुक्यात वीस ते 
पंचवीस हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. या भागात १९९५ मध्ये करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. केळीच्या बागा रात्रीतून पिकून गेल्या होत्या. तेव्हापासून या भागात रोगाचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात होत असतो. दरम्यान, यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा केळीवर व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, केळीची गुणवत्ता खालावल्याने व्यापारी केळी उचलायला तयार नाहीत. १५ ऑगस्टपूर्वी दीड हजारावर पोहोचलेला दर सध्या तीनशे ते चारशे रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघत नाही. परिणामी, अर्धापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे घड कापून शेतात रोटावेटर चालवला आहे. या शेतात सध्या हरभरा किंवा गहू पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. नवीन केळीच्या पिकावरही मोझॅकचा प्रादुर्भाव होत असल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

प्रतिनिधी...
सध्या केळीला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळत आहे. व्यापारी प्रतिक्विंटल साठ रुपये कमिशन घेतात. शेतातून एका झाडाची वाहतूक करण्यासाठी सात रुपये खर्च येतो. सध्या मिळणाऱ्या दरात लागवड खर्चही निघत नसल्याने केळी काढावी लागली. तर दुसरीकडे वीजबिलाच्या सक्तीने वसुली होत असल्याने अडचणीत भर पडली आहे.
- ज्ञानेश्‍वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड

अतिवृष्टीमुळे १५ ऑगस्टनंतर केळीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळाची गुणवत्ता घसरली आहे. यामुळे खरेदीदार केळी उचलायला तयार नाहीत. परिणामी, दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. 
- नीलेश देशमुख, केळी अडतदार,  अर्धापूर, जि. नांदेड.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...