Agriculture news in Marathi Rounds for postgraduate admission in agriculture from 13th November | Page 2 ||| Agrowon

कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३ नोव्हेंबरपासून फेऱ्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होत असून, १३ नोव्हेंबरला पहिली फेरी होईल. 

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होत असून, १३ नोव्हेंबरला पहिली फेरी होईल. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या म्हणण्यानुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विद्याशाखांसाठी होत असलेल्या या प्रवाशांकरिता दुसरी फेरी २० नोव्हेंबरला तर तिसरी फेरी २७ नोव्हेंबरला होईल. शेवटची चौथी फेरी मात्र सहा ते आठ डिसेंबरला होईल. https://maha.agriadmissions.in या संकेतस्थळावर २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरावे लागतील. राज्यात सध्या दोन वर्षं कालावधीचा पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) अभ्यासक्रम शिकवणारी ३८ महाविद्यालये आहेत.

यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित ११, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे ९, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ तर दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित सात महाविद्यालये आहेत. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित विद्याशाखेची पदवी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरीने (सीजीपीए) उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाकडून सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते. सीईटीचे ७० टक्के गुण आणि पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेतले जातात. यातून पदव्युत्तर प्रवेशासाठी सीजीपीए काढला जातो. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५.५ तर आरक्षित विद्यार्थ्यांना ५.०० सीजीपीए आवश्यक ठरतो.

दहा विद्याशाखांसाठी होणार प्रवेश फेऱ्या
कृषी (एमएससी अॅग्रिकल्चर), उद्यानविद्या (एमएससी हॉर्टिकल्चर), वनशास्त्र (एमएससी फॉरेस्ट्री), मत्सविज्ञान (एमएफएससी फिशरी), अन्नतंत्रज्ञान (एमटेक फुडटेक्नॉलॉजी), कृषी जैवतंत्रज्ञान (एमएससी बायोटेक्लॉलॉजी), कृषी अभियांत्रिकी (एमटेक अॅग्री इंजिनिअरिंग), गृहविज्ञान (एमएससी होमसायन्स), कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए अॅग्री), काढणीपश्‍चात तंत्रज्ञान (एमएससी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी) अशा दहा विद्याशाखांचा समावेश होतो.


इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...