बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात
कोल्हापूर : येथील ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी (ता. ८) विजयादशमी शाही थाटात आणि उत्साहात साजरी झाली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे परंपरागत पद्धतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. या वेळी पोलिस बँड वाजविण्यात आला. दसरा महोत्सव समितीच्या वतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. तलाठी प्रल्हाद यादव यांनी शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा झाल्यानंतर कोल्हापूरकर जनतेने अपूर्व उत्साहात सोने लुटले. या वेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली.
- 1 of 1025
- ››