agriculture news in Marathi RRC action on three sugar factories Maharashtra | Agrowon

तीन साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या तीन साखर कारखान्यांवर राज्याच्या साखर आयुक्तांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कारवाई केली आहे.

पुणे : शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या तीन साखर कारखान्यांवर राज्याच्या साखर आयुक्तांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कारवाई केली आहे. २०१९-२० च्या हंगामात ९७ कारखान्यांवर अशी कारवाई झाली होती. तसेच थकीत एफआरपी देखील २४३ कोटी रुपयांच्या आसपास होती. यंदा मात्र लॉकडाउन असतानाही १४५ कारखान्यांनी गेल्या हंगामात १४ हजार २५० कोटी रुपये एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) वाटत चांगली कामगिरी बजावली आहे. 

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांकडे हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासून एफआरपीसाठी पाठपुरावा केला होता. अनेक कारखान्यांना ‘आरआरसी’ (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाईबाबत इशारा नोटिसादेखील बजावल्या होत्या. 
‘आरआरसी’ कारवाई होणे हे साखर उद्योगात चांगले लक्षण समजले जात नाही. त्यामुळे बहुतेक कारखाने कसेही करून ही कारवाई टाळतात. साखर आयुक्तालय देखील या कारवाईचा बडगा उगारत असते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो व थकीत रकमा चुकत्या होतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

युटेक, वारणा, किसनवीर भुईंज अशा तीन कारखान्यांना मात्र आर्थिक शिस्त पाळता आलेली नाही. संधी दिल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या थकीत रकमा न दिल्याने या कारखान्यांना शेवटी ‘आरआरसी’ प्रमाणपत्र बजावण्यात आले आहे. राज्यातील १२८ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. मात्र उर्वरित कारखान्यांनी अद्यापही ९२ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम अडकवून ठेवल्याचे सांगण्यात आले. 

एफआरपी थकीत असलेल्या १७ कारखान्यांपैकी १६ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत रकमा दिलेल्या आहेत. एका कारखान्याने मात्र ६० ते ८० टक्क्यांपर्यंतच रकमा वाटलेल्या आहेत. २०१८-१९ च्या हंगामात साखर कारखान्यांनी २३ हजार १४४ कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले होते. तरीही ४४ कारखान्यांनी शेतकऱ्यांची २४३ कोटी रुपये थकवले. मागील दोन्ही हंगाम गृहीत धरता ३८३ कोटी ८२ लाख रुपयांची थकीत एफआरपी डोक्यावर घेत राज्याचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे.

...अशी आहे यंदाची `आरआरसी` कारवाई
कारखाना : 
थकीत एफआरपी
युटेक शुगर (नगर) : ८.७७ कोटी
वारणा (कोल्हापूर) : ३१.७० कोटी
किसनवीर भुईंज (सातारा) : २.१४ कोटी


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...