‘टेंभू’ची १ हजार कोटींची कामे लवकरच पूर्ण होणार

दुष्काळी पट्ट्यात शेतीला टेंभू सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला आहे. यामुळे बागायती क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेवर एकूण ४ हजार ८८ कोटी पैकी मार्च २०२१ अखेर ३ हजार ५१ कोटी इतका खर्च झाला आहे.
The Rs 1,000 crore work of 'Tembhu' will be completed soon
The Rs 1,000 crore work of 'Tembhu' will be completed soon

सांगली : दुष्काळी पट्ट्यात शेतीला टेंभू सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला आहे. यामुळे बागायती क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेवर एकूण ४ हजार ८८ कोटी पैकी मार्च २०२१ अखेर ३ हजार ५१ कोटी इतका खर्च झाला आहे. उर्वरित १ हजार ३७ कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, वितरण व्यवस्थेची कामेही लवकर सुरू केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी आणि कवठेमहांकाळ सातारा जिल्ह्यातील कराड व सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला अशा सात तालुक्यांतील २१० गावांतील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजना तयार करण्यात आली. सद्यःस्थितीत या योजनेत आणखी ३० गावांचा समावेश करण्यात आला असून, आता २४० गावांचा यामध्ये समावेश आहे. टेंभू योजनेमुळे २४० गावातील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या १ हजार ४१६ कोटीच्या रकमेच्या मूळ प्रकल्पास शासनाने १९९६ ला प्रशासकीय मान्यता दिली. तर टेंभूच्या प्रथम सुधारित प्रकल्पाच्या २ हजार १०६ कोटीच्या २००४ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाने २०११ ला ३ हजार ४५० कोटी किमतीच्या अंदाज पत्रकास मान्यता दिली आहे. केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या मान्यतेनुसार टेंभूसाठी २२ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. यानुसार पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोयना, वांग, तारळी, आणि कृष्णानदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी असे समाविष्ट करण्यात आले आहे.  

असे मिळणार २२ टीएमसी
धरण चलले जाणारे पाणी (टीएमसी)
कोयना १८.४६
वांग ०.९७
तारळी १.६७ 
कृष्णा नदीचे पुराचे पाणी  ०.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com