वाशीममधील पाणीपुरवठा योजनांसाठी १८१ कोटींची तरतूद

वाशीममधील पाणीपुरवठा योजनांसाठी १८१ कोटींची तरतूद
वाशीममधील पाणीपुरवठा योजनांसाठी १८१ कोटींची तरतूद

वाशीम : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री बबन लोणीकर यांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील २१८ वाड्या/वस्त्यांसाठी १४९ योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला. या योजना राबविण्यासाठी एकूण १८१ कोटी ३९ लाख रुपये अंदाजपत्रकीय खर्च लागणार असून, तो मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा २२२  गावे/वाड्यांसाठी १५३ योजना मंजूर केल्या असून, यावर १८६ कोटी ३९ लाख रुपये खर्च मान्य करण्यात आलेला आहे.

याअगोदर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून २५ गावांसाठी २५ योजना मंजूर केल्या होत्या. यासाठी २४ कोटी २८ लाख  एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणीपुरवठा सुयोग्य रीतीने होण्यासाठी व जिल्ह्यातील तमाम जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रलंबित योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) बांधलेल्या शौचालयांना निधी असे एकत्रित मिळून जिल्ह्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून २१४ कोटी ९६ लाख रुपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला अाहे.

मंजूर योजना, निधी (तालुकानिहाय)

तालूका   गावे/वाड्या/वस्त्या योजनेची संख्या किंमत
कारंजा  ५१ ३३     २३ कोटी १३ लाख       
मालेगाव  २८   १४ २६ कोटी ११ लाख
मंगरूळपीर   ३१  २६    २१ कोटी ७७ लाख
मानोरा  ३५   १८ २० कोटी १६ लाख
रिसोड २८  २३  ३१ कोटी ६५ लाख
वाशीम ३८   २९

 ५३ कोटी ५५ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com