राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये मंजूर

सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५ शेतकऱ्यांचे ठिबक अनुदानाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख तीन हजार ८२१ शेतकऱ्यांना २५० कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता उर्वरित एक लाख ९ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी रुपये मंजूर झाले आहे.
Rs 191 crore sanctioned for drip grant in the state
Rs 191 crore sanctioned for drip grant in the state

सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५ शेतकऱ्यांचे ठिबक अनुदानाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख तीन हजार ८२१ शेतकऱ्यांना २५० कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता उर्वरित एक लाख ९ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी रुपये मंजूर झाले असून, पुढील आठवड्यापासून प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

सततचा दुष्काळाचा सामना करणारा बळिराजा आता ठिबक सिंचनाकडे वळला आहे. दरवर्षी चार लाखांहून अधिक शेतकरी ठिबक अनुदानासाठी अर्ज करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर फलोत्पादन विभागाने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ६६७ कोटींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यापैकी १९१ कोटींचा पहिला हप्ता राज्य सरकारने मंजूर केला असून पुढील आठवड्यापासून अनुदान वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे.

२०१९-२० मध्ये अनुदानाच्या प्रतीक्षेतील एक लाख ९ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी १७० कोटी रुपयांची गरज असून सरकारने मंजूर केलेल्या १९१ कोटीतून संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. दुसरीकडे मात्र २०२०-२१ मध्ये ठिबक केलेल्या शेतकऱ्यांनी कधीपासून अनुदानासाठी अर्ज करायचे, याचा मुहूर्त ठरलेला नाही. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने पुढील हप्ता कधीपर्यंत मिळेल हे निश्‍चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधीपासून अर्ज करायचे हे ठरवले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२०-२१ मध्ये ठिबक अनुदानाचा ६६७ कोटींचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिला हप्ता १९१ कोटींचा मंजूर झाला असून, एक लाख १० हजार शेतकऱ्यांना आता त्यातून अनुदान वितरित केले जाईल. दरम्यान, नुकतेच ठिबक केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करण्याची तारीख निश्‍चित झाली नसून, प्रलंबित शेतकऱ्यांना अनुदानवाटप केल्यानंतर तारीख जाहीर केली जाईल. - शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com