सांगली : नुकसानग्रस्तांच्या खात्यात २० कोटी रुपये वर्ग

Rs. 20 crores on credited to affected farmers account
Rs. 20 crores on credited to affected farmers account

सांगली : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या हफ्त्यापोटी ३४ कोटी ४८ लाखांचा निधी प्राप्त झाला. या निधीपैकी १९ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यातील १ लाख आठ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ११६ कोटी ८१ लाखांची मागणी शासनाकडे केली आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘अवकाळीने जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पिकांचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले.

जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार २१२ शेतकऱ्यांचे एक लाख ८ हजार ९९४ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात पंचनाम्याचा अहवाल आणि ११६ कोटी ८१ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या हफ्त्यापोटी ३४ कोटी ४८ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे मिळाला आहे. त्यापैकी १९ कोटी ७० लाख बॅंकाकडे वर्ग करण्यात आलेत.

शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्याचे आदेश दिलेत.  तासगाव तालुक्‍यातील ६८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे ४३ हजार ८२२ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. खानापुरातील २२ हजार २६५ शेतकऱ्यांचे १८ हजार ३२६, पलूसमधील ५ हजार ५३२ शेतकऱ्यांचे २ हजार ५७ हेक्‍टरवरील पिके वाया गेली.

आटपाडीतील १३ हजार १४१ शेतकऱ्यांचे ७ हजार ७८९ हेक्‍टर, कडेगावातील ९ हजार ९९२ शेतकऱ्यांचे ३ हजार १८० हेक्‍टर, त्यांना २.८५ कोटी निधीची गरज आहे. शिराळ्यातील ६३२ शेतकऱ्यांचे ९६.२४ हेक्‍टर, वाळवा तालुक्‍यातील ६ हजार ८५७ शेतकऱ्यांचे २ हजार ९३१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. मिरज तालुक्‍यातील १७ हजार ५५४ शेतकऱ्यांचे ७ हजार ९३१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले.

जतमधील १५ हजार २६२ शेतकऱ्यांचे ९ हजार ९९० हेक्‍टर, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २८ हजार ८१० शेतकऱ्यांचे १७ हजार ३१६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून पहिल्या हफ्त्यापोटी ३४ कोटी ४८ लाखांची रक्कम मिळाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १९ कोटी ७० लाख रुपये बॅंकेत वर्ग करण्यात आलेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com