agriculture news in marathi, Rs 351 crore draft plan approved for Buldana | Agrowon

बुलडाण्याचा ३५१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जानेवारी 2019

बुलडाणा :  सन २०१९-२० साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत ३५१ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा २१० कोटी १३ लाख, अनुसूचित जाती उपाययोजनेचा १२३ कोटी ५७ लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी १७ कोटी ३९ लाख रुपयांचा त्यामध्ये समावेश आहे. 

बुलडाणा :  सन २०१९-२० साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत ३५१ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा २१० कोटी १३ लाख, अनुसूचित जाती उपाययोजनेचा १२३ कोटी ५७ लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी १७ कोटी ३९ लाख रुपयांचा त्यामध्ये समावेश आहे. 

समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामधून विकासाची व जनकल्याणाची कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, अशी अपेक्षा पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, आमदार चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री येरावार म्हणाले, इंग्रजकालीन व तहसीलदारांनी अतिक्रमण मुक्त केलेल्या पाणंद रस्त्यांचा प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य स्तरावर मोहीम स्वरूपात कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात जनसुविधेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर अनेक छोटी-मोठी कामे होत असतात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला निधी देण्यात येतो. या निधीचा सविस्तर आढावा होणे गरजेचे आहे. या निधीतून अंदाज पत्रकानुसार खर्च आहे किंवा नाही, याबाबत तपासणी करण्यात यावी.

मागील काही वर्षांमध्ये पूर्वसंमती न घेता सूक्ष्म सिंचन संच खरेदी केले. याबाबत प्राप्त शेतकऱ्यांच्या अर्जांवर अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न होतील. पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाने चाऱ्याची टंचाई निर्माण न होण्यासाठी कार्यवाही करावी. मुबलक चारा उपलब्ध राहील याबाबत काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

चुकारे देण्यासाठी सूचना
जिल्ह्यात शासनामार्फत नाफेडच्या माध्यमातून तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र काही शेतकऱ्यांच्या बाबतीत ऑनलाइन नोंदणी नावांचे लॉट ''एन्ट्री'' व्यवस्थित न गेल्यामुळे शेतकरी चुकाऱ्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तुरीवरील अनुदान व चुकाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांनी कार्यवाही करावी. पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही येरावार यांनी केली.

इतर बातम्या
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सटाणा तालुक्यात शेतीशेजारील पाझर तलाव...नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...