संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८ कोटी वितरित
नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ५७८ कोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर २६४ कोटी २८ लाख १७ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ५७८ कोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर २६४ कोटी २८ लाख १७ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
ऑक्टोबरमधील अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४ लाख ८३ हजार ७६७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, बहुवार्षिक फळपिकांचे एकूण १३ लाख ८१ हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या तीन जिल्ह्यासाठी एकूण ९३१ कोटी ६२ लाख ४५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु, जिरायती पिकांच्या मदतीच्या दरात प्रतिहेक्टरी ६ हजार ५०० रुपयांवरुन ८ हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त निधी लागणार आहे.
पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये, बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची किमान रक्कम १ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी ती २ हजार रुपये देय राहील. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा मदतीच्या रकमेतून कोणत्याही बॅंकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. बाधित शेतकऱ्यांना जमीन महसुलातील सूट, शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफी या सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यासाठी १२३ कोटी १४ लाख २३ हजार रुपये, परभणी जिल्ह्यासाठी ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये, हिंगोलीसाठी ५३ कोटी ७६ लाख ६१ कोटी रुपये असा एकूण २६४ कोटी २८ लाख १७ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची गरज होती. दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यासाठी २६९ कोटी ८ लाख ६७ हजार रुपये, परभणी जिल्ह्यासाठी १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी ११७ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
नुकसानभरपाईची मागणी, मंजूर निधी (कोटी रुपये)
जिल्हा | मागणी निधी | पहिला टप्पा | दुसरा टप्पा |
नांदेड | ४३०.९९८० | १२३.१४२३ | २६९.०८६७ |
परभणी | ३१२.४४४५ | ८७.६२७३ | १९१.४८३२ |
हिंगोली | १८८.१८२० | ५३.७६६१ | ११७.४८६१ |
- 1 of 1029
- ››