Agriculture news in Marathi Rs 50 to Rs 100 improvement in tar price | Agrowon

तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

मागणी वाढल्याने देशभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा झाली. चालू सप्ताहात महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली.

पुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा झाली. चालू सप्ताहात महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर तूर उत्पादक राज्यांत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत तुरीचे दर दबावात होते. या दरात तुरीला चांगली मागणी होती. त्यामुळे दरात गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. केंद्र सरकारने हंगाम २०२१-२२ साठी तुरीसाठी हमीभाव ६३०० रुपये जाहीर केला आहे. तर राज्यातील बाजारात समित्यांत मागील काही दिवसांत प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली आहे. चालू सप्ताहात सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर तुरीला मिळाला. अकोला बाजार समितीत ६७०० ते ६८०० रुपये, नागपूर बाजार समितीत ६९५० ते ७००० रुपये, लातूर बाजार समितीत ६५३० ते ६५६० रुपये आणि सोलापूर बाजार समितीत ६५०० ते ६६५० रुपये दर मिळाला. 

कर्नाटकात चालू सप्ताहात तुरीच्या दरात प्रतिक्विंटल ५० रुपये वाढ झाली. येथील बाजारांत तुरीला बऱ्यापैकी दर मिळाला आहे. गुलबर्गा बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल ६४०० ते ६८०० रुपये, बिदर बाजार समितीत ५७०१ ते ६५११ आणि तीलकोट बाजार समितीत ६००० ते ६३२५ रुपये दर मिळाला.

दिल्लीच्या बाजारात तुरीच्या दरात चालू सप्ताहात ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. येथील बाजारात हरियानात येणाऱ्या तुरीचे दर १०० रुपयांनी सुधारले आहेत. येथे जुन्या तुरीला ६५५० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर नव्या तुरीला ६००० ते ६७५० रुपये दर मिळाला.

महत्त्वाच्या घडामोडी

  • आफ्रिकी देशांतून तूर आयातीला विलंब होण्याची शक्यता
  • मोझांबिकमधून तुरीच्या दोन खेप दाखल होण्याचा अंदाज
  • परंतु ही तूर मागणीच्या तुलनेत नगण्य
  • आयातीच्या निर्णयाचा फारसा बाजारावर परिणाम होणार नाही नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...