नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक कर्जवाटप

नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक कर्जवाटप
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक कर्जवाटप

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ८२ हजार ६८७ शेतकऱ्यांना ५१० कोटी ४५ लाख रुपये पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व बॅंकांना १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार २९३ कोटी ४९ लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ३१ हजार ९३० शेतकऱ्यांना ३०४ कोटी ४५ लाख रुपये (४५ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय स्टेट बॅंकेने १९ हजार ४७१ शेतकऱ्यांना १५८ कोटी ४५ लाख रुपये, युनियन बॅंक आॅफ इंडियाने १ हजार ७७७ शेतकऱ्यांना २४ कोटी ९३ लाख रुपये, बॅंक आॅफ महाराष्ट्राने ४ हजार ६१ शेतकऱ्यांना २५ कोटी २० लाख रुपये, बॅंक आॅफ इंडियाने १ हजार ४२० शेतकऱ्यांना १३ कोटी ७० लाख रुपये, अलाहाबाद बॅंकेने ७२ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख रुपये, आयडीबीआय बॅंकेने ४६८ शेतकऱ्यांना ६ कोटी ५९ लाख रुपये, देना बॅंकेने ५८४ शेतकऱ्यांना ६ कोटी ५९ लाख रुपये, कॅनरा बॅंकेने २३५ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख रुपये, आंध्रा बॅंकेने ४९६ शेतकऱ्यांना ४ कोटी २५ लाख रुपये वाटप केले.

बॅंक आॅफ बडोदाने ३३० शेतकऱ्यांना ५ कोटी ६ लाख रुपये, सेंट्रल बॅंक आॅफ इंडियाने ६६७ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख रुपये, विजया बॅंकेने ३२ शेतकऱ्यांना ६१ लाख रुपये, युको बॅंकेने ७५ शेतकऱ्यांना १ कोटी २७ लाख रुपये, कॉर्पोरेशन बॅंकेने ४५ शेतकऱ्यांना ४७ लाख रुपये, ओरिएंटल बॅंकेने ३२ शेतकऱ्यांना ३९ लाख रुपये, अॅक्सिस बॅंकेने १९८ शेतकऱ्यांना ११ कोटी ८८ लाख रुपये, एचडीएफसी बॅंकेने ७४७ शेतकऱ्यांना २१ कोटी ३२ लाख रुपये, आयसीआयसीआय बॅंकेने ६६४ शेतकऱ्यांना ७ कोटी ३२ लाख रुपये, कर्नाटक बॅंकेने २५ शेतकऱ्यांना २६ लाख रुपये, डेव्हलमेंट क्रेडिट बॅंकेने ९७ शेतकऱ्यांना २ कोटी ४५ लाख रुपये, सिंडीकेट बॅंकेने ४५ शेतकऱ्यांना ५१ लाख रुपये पीक कर्जवाटप केले आहे. ३०३ शेतकऱ्यांना ८१.४६ लाख रुपये (४२ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २३७ कोटी १६ लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १९ हजार ४५४ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५४ लाख रुपये (४२ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. २ लाख १० हजार ४३४ शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना ८२ हजार ६८७ शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप झाले आहे. सर्वच बॅंकांची कर्ज वाटपाची गती धीमी असल्यामुळे उद्दिष्टपूर्ती दूर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com