कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी अधिनियमात बदल
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी अधिनियमात बदल

कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी अधिनियमात बदल

मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक किंवा त्यांच्याऐवजी त्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा समावेश कुलगुरू शोधसमितीमध्ये करता येणार आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर तातडीने योग्य व्यक्तीच्या नेमणुकीसाठी शोधसमितीची स्थापना आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम १९८३ च्या कलम १७ (१) नुसार कुलपतींकडून तीन सदस्यीय शोध समितीची स्थापना केली जाते. या अधिनियमातील खंड (अ) मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रात पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती यापैकी एकाचे सदस्य म्हणून कुलपतींकडून नामनिर्देशन केले जाते. तसेच खंड (ब) नुसार नामनिर्देशित व्यक्ती हीच समितीची अध्यक्ष असते. यासोबतच इतर दोन सदस्य नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक आणि राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव किंवा सचिव हे असतात.

यातील कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक हे एकच पद असल्याने आणि त्यांचे कार्यक्षेत्र पूर्ण देशभर असल्याने तातडीच्या परिस्थितीत कुलगुरू निवडीत त्यांच्या वेळेअभावी विलंब होतो. त्यामुळे महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम १९८३ च्या कलम १७ (१) (अ) (दोन)  मध्ये बदल करून निवड समितीत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक यांचा किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले भारतीय कृषी संशोधन परिषदेचे निवृत्त महासंचालक किंवा नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ भरती बोर्डाचे अध्यक्ष किंवा नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com