agriculture news in marathi `Run Dahigaon Upsa Irrigation Scheme on solar energy | Agrowon

`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवा`

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.

जलसंपदामंत्री पाटील यांनी नुकतेच टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. त्याच धर्तीवर दहिगाव उपसा सिंचन योजनाही राबवावी. यापूर्वीही तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून आपण ही मागणी केली होती. त्यांनी ऊर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक यांना अहवाल तयार करण्याच्या लेखी सूचना 
दिल्या होत्या. 

तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले होते. आता पुन्हा एकदा आपण या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहा हजार हेक्टरला फायदा

दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ७५० अश्वशक्तीचे जवळपास नऊ पंप कार्यरत आहे. यामुळे विजेचा जास्त वापर होतो. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे दहिगाव येथील पंपहाऊसच्या जवळ सौरऊर्जा प्रकल्प राबववा. त्यावर ही योजना कार्यान्वित केल्यास वीजेची बचत होईल. शिवाय वीजेअभावी ही योजनेचा पाणी पुरवठाही खंडित होणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...