आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत धावपळ

आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत धावपळ
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत धावपळ

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन व जिल्हा परिषदेच्या स्तरावरील कामांच्या हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही कामांना मंजुरी देता येत नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या कामांना प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषदेत धावपळ सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या धास्तीने दोन आठवड्यांपासून दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेत जवळपास सर्वच सदस्यांनी हजेरी लावली आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामे मंजूर करून घेणे, त्यांची निविदा प्रक्रिया राबविणे, यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची घाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातून येणाऱ्या सदस्य आणि नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने गर्दी वाढली आहे. 

निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विकासकामे मंजूर करणे, वर्कऑर्डर देणे, इतर कामांसाठी प्रशासनाचीही धांदल उडाली आहे. सर्वच विभागांतील कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ जिल्हा परिषदेमध्ये थांबून कामे मार्गी लावत असल्ययाचे चित्र आहे. 

समाजकल्याण विभाग, बांधकाम विभाग, पंचायत विभाग आदी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व सदस्यांची वर्दळ सुरू आहे. शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, सीमाभिंत, रस्ते, सभामंडप आदी विकासकामांच्या मंजुऱ्या आणि निविदा युद्धपातळीवर सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com