agriculture news in marathi, Rupee plunges to new record low | Agrowon

'रुपयाची घसरण थांबता थांबेना'
वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

नवी दिल्ली : रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत असल्याने याचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे. देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 83.73 रुपये आणि डिझेलचा दर 75.09 या आतापर्यंतच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोचला.
 
रुपयाच्या निचांकी घसरणीचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे.  स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आजपासून वाढ झाली. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 502 रुपयांवर गेला आहे. याचबरोबर विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 59 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 879 रुपयांवर गेला आहे. गॅस सिलिंडरच्या दरातील ही सलग पाचव्या महिन्यांतील दरवाढ आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये ग्राहकांना प्रतिसिलिंडर 320.49 रुपये अंशदान मिळत होते. आता ऑक्‍टोबरमध्ये हे अंशदान 376 रुपये झाले आहे. त्याचबरोबर, रुपया महागल्याने आयात, परदेशातील प्रवास, परदेशातील शिक्षण महागले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...