agriculture news in marathi, Rural Development Campaign from Public Sector: Cooperative Minister, Subhash Deshmukh | Agrowon

लोकसहभागातून ग्रामविकास अभियान : सहकारमंत्री सुभाष देशमुख

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसहभागातून विकासाची चळवळ सुरू व्हावी, गावागावांमध्ये सकारात्मक स्पर्धा व्हावी, यासाठी सरपंच आणि लोकांच्या सहभागातून सर्वंकष असे ग्रामविकास अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. १५) दिली. 

सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसहभागातून विकासाची चळवळ सुरू व्हावी, गावागावांमध्ये सकारात्मक स्पर्धा व्हावी, यासाठी सरपंच आणि लोकांच्या सहभागातून सर्वंकष असे ग्रामविकास अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. १५) दिली. 

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गावांसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम असावेत, त्याचे निकष काय असावेत, गावस्तरावर काम करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांची मते जाणून घेण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. 

मंत्री देशमुख म्हणाले, ‘‘प्रत्येकाने आपापल्या गावासाठी काम करावे. आपल्या गावातील पायाभूत मूलभूत सुविधा, पाणी, स्वच्छता, पर्यावरण, तीर्थक्षेत्र, मंदिर ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणे यांचा विकास, शाळा -शिक्षण, कृषी व कृषी आधारित उद्योग व्यवसाय, इतर रोजगारनिर्मिती, प्रक्रिया उद्योग विषमुक्त शेती प्रयोगशील शेती, रोजगारनिर्मिती, प्रशासनात लोकसहभाग, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, उत्पादक यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग इत्यादी विषयांमध्ये काम करणाऱ्या गावांसाठी ही स्पर्धा असेल. त्यातूनच उत्कृष्ट गावे निवडली जातील.’’ 

या स्पर्धेत स्वतःहून ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा आणि अधिकाधिक गावे त्यात सहभाग घेतील, अशी अपेक्षा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांनी व्यक्त केली. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद पूर्णतः सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद दिले. सेंद्रिय शेतीचे अभ्यासक, पोलिस निरीक्षक नाना कदम यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे फायदे, या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असणारे तंत्रज्ञान आणि त्याकरिता उपलब्ध असणारे मनुष्यबळ गावांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असल्याचे नमूद केले.  

या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या संचालिका पूर्वा वाघमारे, अभिजीत पाटील, सल्लागार प्रा. नरेंद्र काटीकर प्रा. देवानंद चिलवंत, शिवाजी पवार यांची समिती कार्यरत केली आहे, असे सांगण्यात आले. पाकणीच्या सरपंच शोभा गुंड, कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार, कलकर्जाळचे सरपंच विवेक ईश्वरकट्टी, सुर्डीच्या सरपंच सुजाता डोईफोडे, बाळगीच्या सरपंच सुमित्रा कासे, अर्जुनसोंडच्या सरपंच सुषमा हावळे, गौडगावचे सरपंच वीरभद्र सलगे, मनगोळीचे सरपंच समाधान घंटे उपस्थित होते. मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले यांनी फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.


इतर बातम्या
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक...सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...