‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना ‘डिजिटल इंडिया ॲवॉर्ड’

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना ‘डिजिटल इंडिया ॲवॉर्ड’
‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना ‘डिजिटल इंडिया ॲवॉर्ड’

मुंबई  : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड’ यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना मिळाला. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रणाली, गावठाण जमाबंदी प्रकल्प व अतिक्रमणे ‍नियमानुकूल करण्याची ऑनलाइन प्रणाली या तीन प्रकल्पांसाठी ग्रामविकास विभागाला हे पुरस्कार मिळाले आहेत.  नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात इस्राईलचे राजदूत रॉन माल्का यांच्या हस्ते ग्रामविकास विभागाने हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना बऱ्याचदा त्यांच्या मूळ गावापासून, जिल्ह्यापासून दूरच्या शाळेत नियुक्ती मिळते व आपल्या कुटुंबाकडे परत जाण्यासाठी त्यांना बदलीचे अनेक प्रयत्न व किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागायचे. जिल्हा परिषद ऑनलाइन आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेद्वारे शिक्षकांना वरील सर्व प्रक्रियेऐवजी आता फक्त संगणकावर विनंती अर्ज करणे एवढेच अपेक्षित आहे. यामध्ये संगणकावरच सर्व रिक्त पदस्थिती भरली जाते व शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमानुसार संगणकाद्वारेच बदली मिळणे शक्य होते. सन २०१७ पासून या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त शिक्षकांची बदली करण्यात आलेली आहे.  अतिक्रमणे नियमानुकूल होणार गायरान जमिनी, सार्वजनिक, वन क्षेत्र व ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही अशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील दिनांक १ नोव्हेंबर २०११ पर्यंतची निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून राहणाऱ्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार नागरिकांना अतिक्रमणे नोंदविण्याची व नियमित करण्याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे आतापर्यंत राज्यातील सुमारे ४ लाख ७० हजार अतिक्रमित घरांची नोंदणी ऑनलाइन झाली आहे. तसेच मोबाईल फोनद्वारे सुमारे साडेतीन लाख अतिक्रमित घरांची मोबाईल अॅपद्वारे जिओ टॅग व टाइम स्टॅम्प फोटोद्वारे पाहणी करण्यात आली आहे. जमिनींचे मॅपिंग योजना राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठीची योजना ही योजनांतर्गत योजना म्हणून राबविण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये गावठाणातील मालमत्तांचे जी.आय.एस. आधारित रेखांकन व मूल्यांकन करण्यात येणार असून, गावठाणातील प्रत्येक घराचा, प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार करण्यात येत आहे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना नगर भूमापन क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मिळकतीची मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार असून त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com