‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधार

ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी व बॅंकांकडून अर्थसाह्य दिले जाते. त्यावर केंद्र सरकारचे तीन टक्‍के, तर राज्य सरकारकडून चार टक्‍के व्याज अनुदान मिळते. उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळाचे सोलापूर जिल्ह्यात १८ हजार १२७ गट आहेत. त्यामध्ये एक लाख ८१ हजार २७० महिला सभासद असून, त्यापैकी बहुतांश महिला उद्योजक बनल्या आहेत. - सोमनाथ लामगुंडे, जिल्हा सन्मवय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधार
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधार

सोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला आर्थिक विकास महामंडळ व बॅंकांच्या मदतीने बचत गटाच्या माध्यमातून गावगाड्यातील महिलांनी उद्योजकतेकडे झेप घेत ऑनलाइन व ऑफलाइन वस्तू, पदार्थ विक्रीद्वारे ग्रामीण अर्थव्यस्थेतला चालना दिली आहे. राज्यभरातील २७ लाख महिलांनी स्वयंरोजगार करीत कुटुंबालाही हातभार लावला आहे.

संघटनात्मक बांधणी, बचतीची सवय, व्यावसायिक क्षमता, नेतृत्व अशा गुणांमुळे ग्रामीण महिलांच्या विचारातही मोठा बदल झाला आहे. सततचा दुष्काळ, पाण्याअभावी ओस पडलेली शेती, हाताला कामधंदा नाही, मुला-मुलींचे शिक्षण होऊनही नोकरीचा पत्ता नाही, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा अन्‌ मुलांच्या शिक्षणाचा यक्षप्रश्‍न यावरही मात करीत गावड्यातून बाहेर न पडणाऱ्या महिला आता तयार केलेल्या वस्तूंचे जागतिक पातळीवर ऑनलाइन मार्केटिंग करू लागल्या आहेत. 

महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या परराज्यांत आणि अमेरिका, इंग्लड, आस्ट्रोलियामध्येही त्यांच्या वस्तू व पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे गावगाड्यातील महिला आता स्थानिक राजकारण असो की समाजकारणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागल्या आहेत. पारंपारिक उद्योग अन्‌ अल्प मजुरीवरील कामाला बगल देत आता ग्रामीण महिलांनी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा ओळखून उद्योग उभारले आहेत. दिवाळीसह अन्य सण-उत्सवात कोट्यवधींची उलाढाल होत असून, आता मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला सुरू असल्याचे चित्र आहे. राज्याची स्थिती  बचत गट : १.५२ लाख महिला सभासद : २७.३९ लाख ऑनलाइन वस्तू, पदार्थ विक्री : १५० दरवर्षीची सरासरी उलाढाल : ४३.९० कोटी ठळक बाबी...

  • महिला आर्थिक विकास महामंडळाचे ॲमेझॉनबरोबर सामंजस्य करार
  • ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या १५० उत्पादनाची ऑनलाइन विक्री
  • बॅंकेद्वारे अर्थसाह्य तर केंद्र व राज्य शासनाकडून मिळते व्याज अनुदान
  • विधवा, परित्यक्‍ता महिलांना उमेद अभियानातून मिळू लागले महिना साडेदहा हजार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com