agriculture news in Marathi rural mart of self help group product Maharashtra | Agrowon

बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’

माणिक रासवे
शनिवार, 7 मार्च 2020

परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तीनशे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘नाबार्ड’च्या सहकार्याने परभणी शहरात ‘रुरल मार्ट’ सुरू करण्यात आला. यामुळे महिला बचत गटांच्या तेजस्विनी ब्रॅंडची उत्पादने एका छताखाली उपलब्ध झाली आहेत. 

परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तीनशे महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘नाबार्ड’च्या सहकार्याने परभणी शहरात ‘रुरल मार्ट’ सुरू करण्यात आला. यामुळे महिला बचत गटांच्या तेजस्विनी ब्रॅंडची उत्पादने एका छताखाली उपलब्ध झाली आहेत. 

महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी येथील नयी रोशनी लोकसंचलित साधन केंद्रातर्फे सन २०१८ च्या मे महिन्यात महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी परभणी शहरात विक्रीचे दालन सुरू करण्यात आले. त्या वेळी या दालनात परभणी शहरातील २० महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध ठेवली जात असत. आजवर विविध उत्पादनांच्या विक्रीतून नऊ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. एकूण ५६ हजार ६०० रुपये एवढा नफा मिळाला आहे. 

फेब्रुवारी महिन्यात या दालनाचा विस्तार करून त्याचे रूपांतर रुरल मार्टमध्ये करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेकडून (नाबार्ड) दोन वर्षाकरिता ३ लाख २१ हजार रुपये एवढे अर्थसाह्य मिळाले आहे. या अर्थसाह्यामध्ये सेल्सवुमनचे मानधन; तसेच जागेचे भाडे या बाबींचा समावेश आहे.

परभणी शहरातील २६० महिला बचत गट; तसेच परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पूर्णा तालुक्यातील मिळून ४० महिला बचत असे एकूण ३०० महिला बचत गट सहभागी झाले आहेत. उत्पादनांच्या विक्रीतून महिलांना मिळणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम साधन केंद्र शुल्क म्हणून घेते; तर ९० टक्के रक्कम संबंधित महिला किंवा गटास दिली जाते.

‘नार्बाड’चे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, महिला आर्थिक 
विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक नीता अंभुरे, सहयोगीनी जयश्री टेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मोरे, मीरा कऱ्हाळे, तारामती गायकवाड, सत्यशिला गुडे, पल्लवी गडकरी, सुरेखा खाडे आदी या विक्री दालनाचे व्यवस्थापन करतात. 

‘रुरल मार्ट’मध्ये मिळतात या वस्तू
रुरल मार्टमध्ये उपलब्ध उत्पादनामध्ये गहू, ज्वारी, सेंद्रिय पद्धतीने पीकविलेल्या हातसडीच्या विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणची, महिला, मुलींचे रेडिमेड ड्रेस, नऊवारी साड्या, नक्षीकाम केलेले कपडे, सिमेंट कुंड्या, चुली आदी गृहउपयोगी वस्तू, कार्यालयीन उपयोगात येणाऱ्या कागदी फाइल्स, बॅाक्स फाइल्स, पेपर कव्हर, कागदी; तसेच कापडी पिशव्या, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


इतर महिला
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
महिला शेतकरी कंपनीने दिली शेती, ग्राम...शेती आणि पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी रिहे (...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
काथ्या, काजू प्रक्रिया उद्योगात...कठोर परिश्रम आणि संकटांना ताकदीने तोंड देत इळये (...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...