ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम अन्यायकारक : भाजप 

अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील वीजकपात करण्याचा तसेच पथदिवे बंद करणे, पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्याचे सत्र शासनाने सुरू केले आहे.
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम अन्यायकारक : भाजप  Rural power cuts unjust: BJP
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम अन्यायकारक : भाजप  Rural power cuts unjust: BJP

अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील वीजकपात करण्याचा तसेच पथदिवे बंद करणे, पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्याचे सत्र शासनाने सुरू केले आहे. अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन वसुलीसाठी कारवाई करू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी अधिकारी ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. हा प्रकार योग्य नसून, जनतेसाठी भाजप या विरुद्ध आंदोलन उभारेल, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमरावती विभागीय वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कच्छोट यांना निवेदनाद्वारे दिला.  निवेदनात म्हटले आहे, ‘‘ग्रामीण भागात भर पावसात अंधाराचे साम्राज्य शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारद्वारे करण्यात येत आहे. सरकारने भर पावसात ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील विद्युतपुरवठा खंडित केला. दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची जोडणी खंडित करून जनतेला मूलभूत सुविधांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन नसताना सरकारचा हा निर्णय ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा आहे. या शासनाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आदेश काढून ग्रामपंचायतीला वीज देयक भरण्याचा आदेश दिला. परंतु कोणतीही वेळ न देता भर पावसामध्ये जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला. पथदिवे बंद करण्यात आले. पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागातून १०५ कोटी रुपये वसूल करा, असा निर्देश वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. वसुली न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिल्या गेला आहे. शासनाने निर्णय बदल न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, डॉ. शंकरराव वाकोडे, राजेश बेले, माधवराव मानकर, विजय अग्रवाल, गिरीश जोशी यांच्यासह इतर उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com