सातबारा, संगणकीकरणाची प्रकरणे निकाली काढा ः शशिकांत हदगल

अंबड, जि. जालना : उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी बुधवारी (ता.२९) दुपारी विविध कामकाजाचा आढावा घेतला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, सातबारा, संगणकीकरणाची प्रकरणे आदीविषयी कार्यवाही करुन प्रकरणे त्वरीत निकाली काढा, अशा सूचना दिल्या.
 Saatbara, computerization cases Resolve : Shashikant Hadgal
Saatbara, computerization cases Resolve : Shashikant Hadgal

अंबड, जि. जालना : उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी बुधवारी (ता.२९) दुपारी विविध कामकाजाचा आढावा घेतला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, सातबारा, संगणकीकरणाची प्रकरणे आदीविषयी कार्यवाही करुन प्रकरणे त्वरीत निकाली काढा, अशा सूचना दिल्या. 

नायब तहसीलदार चिंतामन मिरासे, बाबुराव चंडोल, घनसावंगीचे नायब तहसिलदार संदिप मोरे, डी. एम.पोटे, अव्वल कारकून विष्णु काळे उपस्थित होते.  महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. तालुक्यातील चंदनापुरी खु., धनगर पिंपळगाव, एकलहेरा, गोंदी, हस्तपोखरी, जोगेश्वरवाडी, कोंबडवाडी, करंजळा, कौचलवाडी, किनगाववाडी, लोणार भायगाव, पारनेर, रुई, शिराढोण, सोनक पिंपळगाव, हारतखेडा आदी गावात २३ कामे सुरु आहेत. यामध्ये २७४ मजूर काम करत आहेत. 

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा सिंचन विहिरीची ३८ कामे आहेत. यामध्ये अंतरवाली सराटी, बनटाकळी, भनंगजळगाव, चंनापुरी बु., दहिपुरी, दोदडगाव, डोमेगाव, दुनगाव, गंगाचिंचोली, हसनापूर, कासारवाडी, कवडगाव, खडकेश्वर, कोठाळा, लालवाडी, मठजळगाव, पागीरवाडी, रोहिलागड, शेवगा, ताडहादगाव, वसंतनगर, आलमगाव, पानेगाव, साडेसावंगी, शहापूर, सिरनेर, वडीगोद्री, वाळकेश्वर या गावांचा समावेश आहे. 

कंपार्न्टमेंट बंडिंगची बारा कामे मंजूर आहेत. यामध्ये भालगाव, दाढेगाव, ढाकलगाव, देशगव्हान, किनगाववाडी, राहुवाडी, रामगव्हाण बु., रुई, शहागड, शहापूर, वडीगोद्री यांचा समावेश आहे. मास्क बांधून सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी डी. टी. भिसे यांनी दिल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com