जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावे आठ दिवसांत दुष्काळसदृश कशी : सचिन सावंत

जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावे आठ दिवसांत दुष्काळसदृश कशी : सचिन सावंत
जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावे आठ दिवसांत दुष्काळसदृश कशी : सचिन सावंत

मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेली १६ हजार दुष्काळमुक्त गावे केवळ आठ दिवसांतच दुष्काळसदृश यादीत कशी दिसू लागली? सरकार त्या १६ हजार गावांची यादी प्रकाशित करत नाही, यातच दाल मे कुछ काला नाही तर सगळी डाळच काळी आहे हे स्पष्ट होत आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. शासनाच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार अभियानावर ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात लोकसहभाग १० टक्केदेखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा लपवण्यासाठी राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सावंत म्हणाले, की यंदा राज्यात २०१८ च्या ''जीएसडीएच्या'' अहवालानुसार २५२ तालुक्यांमध्ये १३ हजार ९८४ गावांत गेल्या ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा १ मीटरपेक्षा अधिक भूजलपातळी खाली गेली असली, तरीही प्रत्यक्ष राज्यात त्याच अहवालानुसार एकूण ३१ हजार १५ गावांत पाण्याची पातळी खोल गेली आहे, ही जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करणारी वस्तुस्थिती आहे. फडणवीस सरकारचे जलयुक्त शिवार घोटाळ्यातील कंत्राटदार आणि सरकारचे हितसंबंध उघडे पडतील, म्हणूनच कमी पावसाचा दाखला देऊन शेतकऱ्यांनी उपसा केला. यातील घोटाळा दडवण्यासाठी ज्या गरीब शेतकऱ्याचा आडोसा सरकार घेत आहे. त्यांच्याच माथी दोष टाकण्याचा सरकारचा कुटील डाव आहे.  सावंत यांनी जीएसडीएचे २०१४ व २०१५ मधील अहवाल सादर केले. २०१४ मध्ये राज्यात शासनाच्याच आकडेवारीनुसार ७०.२ टक्के सरासरी पाऊस पडला होता. जीएसडीएच्या २०१४ च्या अहवालानुसार राज्यात त्या वेळी १९४ तालुक्यांतील केवळ ५ हजार ९७६ गावांत पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा अधिक कमी झाली होती. २०१५ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ५९.४ टक्के पाऊस पडला होता. जीएसडीएच्या २०१५ च्या अहवालानुसार, २६२ तालुक्यांतील १३ हजार ५७१ गावांत भूजलपातळी १ मीटरपेक्षा खाली होती. या वर्षी सरासरी ७४.३ टक्के पाऊस पडूनही २०१४ व २०१५ पेक्षा जास्त म्हणजे १३ हजार ९८४ गावांत भूजलपातळी १ मीटर पेक्षा खाली जात असेल तर जलयुक्त शिवार अभियानाचा उपयोग शून्य झाला असून, हा घोटाळा आहे हे स्पष्ट होत आहे, असे सावंत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com