क्षारपड जमीन सुधारण्यासाठी हेक्टरी ६० हजार अनुदान: सदाभााऊ खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

कोल्हापूर: देशात प्रथमच श्री गुरूदत्त साखर कारखान्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्याचा समूह गट तयार करून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी हेक्टरी ६० हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. शिरोळ तालुक्यात ९४o० हेक्टर जमीन क्षारपडयुक्त आहे. ही जमीन क्षारपडमुक्त करण्याचा निर्धार शासनाच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूदत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना दिली. अध्यक्षस्थानी  राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके होते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत शिरोळ तालुक्यातीत मजरेवाडी, तेरवाड, हेरवाड येथील ७३२ हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमासाठी शासनाकडून ४ कोटी ३९ लाख इतकी रक्कम मंजूर झाली आहे. या कामाचा शुभारंभ मजरेवाडी येथे करण्यात आला.  गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे म्हणाले, गुरूदत कारखान्याने नेहमीच विविध शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन समाजाभिमुख कार्य केले आहे. तालुक्यातील ९४०० हेक्टर क्षारपड जमिनीचा कायापालट ना. खोत यांच्या सहकार्याने संपूर्ण तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला आहे. तसेच गुरुदत्त साखर कारखाना प्रतिएकर ४ हजार रुपयांचे अनुदान देणार असून क्षारपड जमिनीचा प्रश्न निकाली निघेल. गुरुदत्त कारखान्यांने उसाला प्रतिटन ३०६४ रुपये इतका उच्चांकी दर दिल्याबदल घाटगे यांचा शिरोळ तालुक्यासह सीमा भागातील अनेक शेतकऱ्यांनी सत्कार केला. गुरुदत्तचे संचालक बबन चौगले यांची द. भा. जैन सभेच्या संचालकपदी निवड झाल्‍याबद्दल तसेच २० हजार लाळ्याखुरकत जनावरांची तपासणी करून मोफत उपचार केल्‍याबद्दल डॉ. एस. डी. लटके, डॉ. अभिजित पुजारी, डॉ.  कुरुंदवाडे, डॉ. लंगोटे यांचा नाम. खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुरुदत्तचे संचालक बबन चौगले यांनी स्वागत केले. गुरुदत्तचे एक्‍झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक - निंबाळकर, गोकुळचे संचालक अनिलराव यादव, जि. प. सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, राजवर्धन नाईक - निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, स्टेट बँकेचे फिल्ड ऑफिसर विजय शेट्टे, सुरेश मगदुम, धनाजीराव जगदाळे, रामचंद्र डांगे, मुकुंद गावडे, पृथ्वीराज यादव उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com